फिश फार्मिंग बायोफ्लोक पद्धत ( विज्ञान आश्रम ,पाबळ फिश फार्म ):-
बायोफ्लॉक :- फिश्फार्मिंग ची दुसरी एक पद्धत म्हणजे बायोफ्लॉक ,या मध्ये आश्रमात १०००० लिटर ची टाकी बांधून पाण्याचे तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस ठेवण्यासाठी त्याला फोम सिटने इन्शुलेशन करून वरून काळा कलरच्या कापडाने झाकले आहे .या मध्ये अमोनिया चे रुपांतर नायट्रेट मध्ये करण्यासाठी हेट्रोट्रोपिक ब्याक्टेरीयाचे कल्चर याच पाण्यात C:N रेशो १:१० ठेऊन वाढवल्या जातात .यामध्ये प्रोटीन म्हणून माश्यांचे फीड व कार्बन म्हणून गव्हाचा भुसा ,तांदळाचा भुसा ,गुळ यांचा वापर केला जातो .यामुळे ऑक्सिजन चे प्रमाण ७ ते ८ppm DO लागतो .त्यामुळे सतत एअर ब्लोअर चालू ठेवावे लागतात .
यामध्ये तिलापिया जातीचे ८६४ मासे साधारण ५४ kg वजन,सरासरी वजन ६५ gm मासे आहेत.व त्या मध्ये ५० कोई मासा सोडला आहे जेणेकरून तिलापियाचे ब्रीडिंग झाले तर त्यांची पिल्ले खाऊन तो मासा वाढेल .अशा प्रकारची ट्रायल लावली आहे .
एक हजार लिटर च्या IBC मध्ये सरासरी वजन १२० gm चे ३० तिलापियाचे मासे सोडले आहेत .यामध्ये पाण्याचे तापमान हिटर लावून सेट केले आहे .या मध्ये अॅझोला वाळून , आंबून , माश्यांना फीडिंग करुन त्यांच्या वजनातील फरकांचा अभ्यास करत आहोत
बायोफ्लोक मधील एअर ब्लोईंग :- बायोफ्लोक मध्ये बॅक्टेरिया वाढून माश्यांच्या विष्टेतून तयार होणारा अमोनिया चे रुपांतर नायट्रेट मध्ये केले जाते .यामुळे या टाकीमध्ये ७ ते ८ PPM ऑक्सिजन पाण्यात विरघळलेला पाहिजे .म्हणून ब्लोअर कायम चालू ठेवावा लागतो ,परंतु आश्रम मध्ये आम्ही पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन माश्यांना किती वेळ पुरतो व किती वेळा नंतर मासे ऑक्सिजन घेण्यास वर येतात .या नुसार ब्लोअर चे वेळ १५ मिनिट चालू व १० मिनिट बंद असे ठेवले आहे .
ब्लोअर मधील हवा एअर स्प्रेडर मध्ये एक सारखी रहावी यासाठी बनवलेला पाईप चा फुगा ,या मध्ये ब्लोअर मधून हवा येवून ती साठवली जाते व पुढे जाणाऱ्या हवेचा प्रेशर एकसमान ठेवला जातो .म्हणून पाण्यात एकसारखे ब्लोईंग होते .
बायोफ्लोक मध्ये पाण्याचा ph ६.५ ते ७.५ ppm ,अमोनिया ०.० ppm ,पाण्यात विरघलेला ऑक्सिजन ७ ते ८ ppm, C:N रेशो १:१० मेन्टेन करून तयार होणारा फ्लॉक कमीत कमी १०ML ते जास्ती जास्त ४०ML ठेवावा लागतो .
बायोफ्लोक तयार करण्याची पद्धत :-
पाण्याचे तापमान २८ अंश सेल्सिअस असणे गरजेचे आहे .टाकी मध्ये २००० लिटर पाणी घेऊन १.५ kg जाड मीठ टाकून पाणी निर्जंतुकीकरन करून पाण्याची क्षारता वाढून घेतली.नंतर यामध्ये २०० gm शेंगदाणा पेंड व ५०० gm गव्हाचा भुसा तीन दिवस आंबून टाकला .व या मध्ये बायोफ्लोक चे कल्चर टाकले .दर दोन तासांनी १० ml एकून ३० ml कल्चर टाकले .या नंतर C:N रेशो १:१० मेन्टेन करून तयार होणारा फ्लॉक मेन्टेन ठेवणे गरजेचे असते .व दररोज तयार होणारा स्लच ड्रेनेज व्हॉल उघडून काढणे .असे केले तर अमोनिया मेन्टेन राहतो .व फ्लोक चांगल्या प्रकारे तयार होतो .
आश्रम फिश फार्म वर आम्ही बायोफ्लोक तयार करण्यासाठी १ kg गव्हाचा भुसा व १ kg गुळ टाकले .१ लिटर कल्चर टाकले .दुसऱ्या दिवशीसुद्धा १ kg गव्हाचा भुसा व १ kg गुळ टाकून जुन्या टाकीतील १० लिटर बायोफ्लोक चे पाणी टाकले .या नुसार मिळालेल्या खालील रीडिंग :-
या बायोफ्लोक मध्ये सरासरी वजन ५०० gm चे ४०० मासे असणे सिस्टीम मेन्टेन ठेवणे सोपे जाते आम्ही बायोफ्लोक टाकीत तिलापिया मासा ५९.३५१ kg सरासरी वजन ६१.५० gmचे ९६५ नग सोडले व कोई मासा १,८८३ kg सरासरी ३७.६६ gm चे ५० मासे सोडले .
ट्रायल :१ मध्ये अनुभवलेल्या गोष्टी :- बायोफ्लोक सेट करून चार दिवसानंतर यामध्ये मासे सोडले .बायोफ्लोक मध्ये प्रोटीन किव्हा कल्चर चांगले ग्रो झाले नसल्याने बायोफ्लोक तयार झाला नाही ,यामुळे माश्यांच्या विष्टे मधून तयार होणाऱ्या अमोनियाचे रुपांतर नायट्रेट मध्ये झाले नाही म्हणून अमोनिया ८ PPM पर्यंत जाऊन मासे मरण्यास सुरवात झाली . दिनांक २४/9/२०२० ला ३३ मासे मेले. दिनांक २५/9/२०२० ला ४७ मासे मेले. यामुळे आम्ही सगळे पाणी काढून नवीन पाणी भरले व अमोनिया कमी ठेवण्याचा प्रयत्न केला .या नंतर तीन चार दिवस बायोफ्लोक केला नाही.या ट्रायल मध्ये माश्यांच्या वजनाच्या ३.७ % ने माश्यांना फीड केले होते परंतु अमोनिया वाढल्याने मासे ट्रेस मध्ये जाऊन माश्यांनी फीड खल्ले नाही म्हणून फारसे वजन वाढले नाही.तरी या ट्रायल म्श्ये एकून ९० मासे ५.२२९ gm चे मेले. .
दिनांक २०/१०/२०२० या दिवशी सगळे मासे काढून माश्यांचे वजन करून FCR काढला .
FCR म्हणजे माश्यांना दिलेले खाद्याचे रुपांतर माश्यांच्या वजनात किती रुपांतर झाले हे तपासणे .म्हणून FCR= दिलेले खाद्य / वाढलेले वजन
माश्यांचे एकूण वजन :- ६५.७२२- माश्यांचे आदीचे वजन :- ६१.२३४ =४.४८८ kg वाढलेले वजन .म्हणून ४.४८८/दिलेले खाद्य २२ kg =४.९० चा FCR आला .FCR १ चा असणे किव्हा यापेक्षा कमी असणे चंगले असते व व्यवसायात चांगला नफा होतो .
ट्रायल :२ कार्बन सोर्स म्हणून गव्हाचा भुसा टाकून कार्बन वाढून बायोफ्लोक तयार करून ट्रायल लावली आहे.या मध्ये बायोफ्लोक होण्यासाठी पाण्याची क्षारता वाढवण्यासाठी १.५ kg जाडे मीठ टाकून दर दिन तासांनी १० ML ३० ML कल्चर टाकून बायोफ्लोक २० ML सेट केला आहे.