मुरबाड फिश फार्म

उद्दिष्ट :- हायड्रोपोनिक्स सिस्टीम मधून विदेशी भाजीपाल्याचे उत्पादन करणे ,व याला लागणारे खतांचा खर्च कमी करण्यासाठी फिश्फार्मिंग करून ते पाणी हायड्रोपोनिक्स मध्ये वापरून खतांचा खर्च कमी करून विदेशी भाजीपाला व फिश चे प्रोडक्शन करणे .या सगळ्याचा विचार करून अशी सिस्टीमचे नियोजन केले .

पूर्ण जमिनीचा नकाशा काढून मापन केले व मोकळ्या शेड मध्ये फिश टँक चे नियोजन व शेड च्या भिंतींवर NFT हायड्रोपोनिक्स सिस्टीम करने व बाहेर असलेल्या जमिनीचे पार्ट विभाजन करून एका प्लॉट शेडनेट मध्ये NFT हायड्रोपोनिक्स सिस्टीम , व दुसऱ्या प्लॉट पॉलहाउस मध्ये DWC हायड्रोपोनिक्स सिस्टीम करणे व सेड च्या मागील बाजूस पाणी फिल्टर साठी MBBR सेटअप टँक चे नियोजन केले .

नियोजनानुसार स्केच बनवले ,या मध्ये तीन टँक दहा हजार लिटरचे व एक टँक पाच हजार लिटर चा दिला .या टँकला ड्रेनेज पाईप देऊन ओवर फ्लो काढून व्हॉल मधून सप्लाय एका चेम्बर मधून पुढे MBBR टँक मध्ये घेतला साधारण १००० लिटरचे चार MBBR टँक मधून हे पाणी ५००० लिटरच्या टँक मध्ये जाईल व पाण्याच्या पंपाच्या सहायाने हे पाणी NFT हायड्रोपोनिक्स सिस्टीम , व DWC हायड्रोपोनिक्स सिस्टीम या मधून फिरून पुन्हा त्याच टाकीत येईल व या मधून फिल्टर झालेले पाणी फिशटँक मध्ये परत जाईल अश्याप्रकारे सिस्टीम मधील २०% पाणी दररोज फिल्टर होईल .अशी सिस्टीम डिझायनिंग केली .

टाकीचा पाया बांधताना शेड मध्ये चार फिशटँक साठी जागा अडचणीची वाटू लागल्या मुळे ५००० लिटरचा फिशटँक MBBR सेटअप साठी घेतला व शेड मध्ये तीन दहा हजार लिटरचे फिशटँक बांधण्यास सुरवात केली .विटांची १ फुट उंचीची ,४ मीटर व्यास असलेली रिंग बांधून प्लास्टर करून घेतली व या मध्ये बारीक वाळू ने अर्धी रिंग भरून घेतल्या . ड्रेनेज प्लम्बिंग साठी २ मीटर चा ७५ MM PVC पाईप सेंटर ला देऊन L लावून घेतला व ड्रेनेज मध्ये पाणी येण्यासाठी रिंग मध्ये ४ इंचाचा स्लोप दिला .

रिंगवर ३ फुटाची वेल्डमेश जाळी गोलाकार लावून JI तार ने बांधून घेतली .काळ्या कलरचा २५० मायक्रोन चा पेपर ( इनर ) जाळीला लावून घेतली .व या नंतर मेन फिशटँक चा ५०० मायक्रोन चा जाड गोलाकार फिशटँकचा कापड पसरून घेतला .

ड्रेनेज पाईप ची प्लम्बिंग

टाकीचा ड्रेनेज पाईप मधून मासे जाणार नाहीत इतके लहान (८ MM ) चे होल मारले .व वरील बाजूस एन्डकँप लावली .टाकीचा पेपर स्लोप मध्ये पसरवून सेंटर चा L ला टाय ने बांधून त्याला क्रॉस कापून घेतले .व या L कापड मध्ये ड्रेनेज चा पाईप बसवला .जेणेकरून फिशटँक मध्ये तयार होणारा गाळ काढण्यासाठी व सिस्टीम मध्ये पाणी फिरते ठेवण्यासाठी ड्रेनेज पाईपचा उपयोग होईल .

माश्यांना टाकीतील पाण्यात DO वाढवण्यासाठी ३८५ वॅटचा ब्लोअर AC वर व २३० वॅटचा ब्लोअर इन्व्हर्टर वर चालवण्यासाठी सप्लाय केले .ब्लोअर स्टँड बनवून घेतला .यावर दोन ब्लोअर फिटिंग करून पुढील सप्लाय UPVC १२.५ MM पाईपची प्लम्बिंग केली .व पुढे एअर स्प्रेडर लावले .

एका फिशटँक मध्ये दोन एअर स्प्रेडर AC सप्लाय ब्लोअर चे दिले व एक सप्लाय इन्व्हर्टर ब्लोअर सप्लाय दिला .जेणेकरून लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टर ब्लोअर चालू होवून माश्यांना ऑक्सिजन ची कमतरता पडणार नाही .ब्लोअर चालू करून पाण्यातील ऑक्सिजन व तापमान सेट करून एका टाकीत साधारण ३ इंचाचे व २ gm चे ४०० मासे म्हणजे तीन टाकीत १२०० तिलापिया माश्यांची पिल्ले ट्रीटमेंट करून सोडली.व त्यांना वजनाच्या 5% ने फीड दिवसातून दोन वेळा टाकण्यास सांगितले .तसेच तीन दिवसातून एकदा पाणी परीक्षण करण्यास सांगितले .

सिस्टीम चे पुढील काम सुरु आहे .