उद्दिष्ट :- फिश्फार्मिंग मध्ये काम करणाऱ्या जलजीविका या प्रायवेट कंपनीला माश्यांची सिड स्टॉक करून दोन ते तीन इंचापर्यंत वाढवून शेतकर्यांना देणे .या साठवणुकीसाठी ही सिस्टीम बनवण्यात आली .
सिस्टीम चे नियोजन व बांधकाम पद्धत :-
या सिस्टीम मध्ये फिश टॅॅॅक सव्वा लाख लिटर पाणी बसेल एवढी टाकी बनवायची होती .ती टाकी सहज काढून दुसरी कडे नेता आली पाहिजे म्हणून आम्ही ती जमिनीवरील पत्र्याची टाकी व आत मध्ये शेत तळ्याचा ५०० मायक्रोन चा पेपर टाकणे अशी बांधायची ठरवली .या टाकीतून स्ल्च काढण्यासाठी एक सेन्ट्रल ड्रेनेज व सायफन द्वारे पाईप ची ग्रीड बनवायची असे ठरले .व हे दोन सप्लाय सॅन्ड फिल्टर मधून पाच हजार लिटर च्या जमिनीत खड्डा घेऊन एक स्ल्च टाकी बांधून त्यात सोडणे व या मध्ये जास्त प्रमाणात ऑक्सिजन देवून MBBR टाकून तयार होणारया अमोनिया कमी करणे व पुन्हा पाणी मोटर ने तळ्यात सोडणे .असे सिस्टीम चे नियोजन ठरले .
नियोजना नुसार काम सुरु केले .प्रथम सहा मीटर त्रीज्येचा वर्तुळ आखून टाकीच्या सपोर्ट पोल साठीचे २२ खड्डे २ फुट लांबी,रुंदी व खोली घेऊन केले .या मध्ये दगडांचे पिंचींग करून त्यात ५० *५०*३ चे L अँँगल दगडांच्या भराव व कॉक्रीट टाकून उभे केले .
टाकीच्या सपोर्ट पोल ला एक ५० MM ची पट्टी वेल्ड करून या फ्रेम वर खाली २ MM व वरती १ MM जाडीचे पत्रे दोन लेअर मध्ये नट बोल्टिंग करून लावले .
पत्र्याच्या टाकीत ५०० मायक्रोन चा शेततळ्याचा पेपर पसरून दोरीने बांधून घेतला .या टाकीतून स्ल्च काढण्यासाठी प्लॅॅन्झ च्या हेड ला PVC एन्डकॅप लाऊन लहान मासे जाणार नाहीत एवढे ८ MM चे होल मारून सेन्ट्रल ड्रेनेज व सायफन द्वारे पाईप ची ग्रीडचे सप्लाय केले .
ड्रेनेज चे सप्लाय झाल्यानतर स्ल्च टाकी साठी दोन मिटर त्रिज्येचा वर्तुळ आखून खोली १ मीटर चा खड्डा केला व या मध्ये सुद्धा ५०० मायक्रोन चा शेत तळ्याचा पेपर टाकून पाणी भरून घेतले .
प्रमुख फिश टॅॅॅक व स्लच टॅॅॅक याच्या मधोमध सॅन्ड फिल्टर सेट केला व स्लच पंपाचे सप्लाय फिल्टर ला दिले व फिल्टर मधून तळ्यात पाणी टाकण्याची प्लम्बिंग केली .व ड्रेनेज ,सायफन ची प्लम्बिंग स्लच टॅॅॅक जोडली .
एअर ब्लोअर फिटिंग चे नियोजन :-
फिश टॅॅॅक व स्लच टाकी मध्ये ड्रोईग मध्ये दाखवल्याप्रमाणे एअर सप्लाय केले .
1 HP चा एअर ब्लोअर वापरला .याला T देऊन दोन सप्लाय काढले .पाण्यात एअर स्प्रेड करण्यासाठी अॅरॉक्सी ट्यूब चे एअर स्टेशन केले .दोन्ही टाकीत 50MM चा HDP पाईप वापरून त्याला ग्रोमेट व टेक अप च्या सहाय्याने एअर सप्लाय प्लम्बिंग केली .
या संपूर्ण सिस्टीम ला कंट्रोल करण्यासाठी पाण्याच्या व एअर ब्लोअर ला टाईमर सेट करून पॅनल बॉक्स बसवला .अशाप्रकारे या सिस्टीम चे काम पूर्ण करून टेस्टिंग घेतल्या .टेस्टिंग मध्ये पाईप ची ग्रीड तयार करून सायफन पद्धत वापरली होती परंतु सायफन लावायला पाण्याचा प्रेशर तयार करता येत नव्हता म्हणून तो सायफन चालला नाही .या ग्रीड ला ,पाण्याचा पंप लाऊन सिस्टीम चालू ठेवली .