विज्ञान आश्रम फिश फार्म

प्रस्तावना :-

“ॲक्वापाॅनिक्स” म्हणजे हायड्रोपाॅनिक्स (माती-रहित शेती) आणि मत्स्यशेती ह्याचे एकत्रीकरण. सोप्या शब्दात भाजीपाला आणि मासे ह्याचे एकत्रित संगोपन असेही म्हणता येईल. ॲक्वापाॅनिक्समध्ये झाडे आणि मासे ह्यांच्या एकमेकांना पूरक अश्या रचनेतून शाश्वत पद्धतीने शेती करणे शक्य होते. ही शेतीची संकल्पना तशी जुनी असून व्यावसायिक शेतीमध्ये ह्याचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगामध्ये होत आले आहेत. “ॲक्वापाॅनिक्स”मध्ये अन्नद्रव्यांच्या नैसर्गिक ‘चक्राचा’ वापर करून झाडांच्या वाढीसाठी आवश्यक सर्व घटक पुरवता येतात. तसेच पाण्याचाही ९०% पर्यंत पुनर्वापर केला जातो. त्यामुळे कमी जागेत आणि कमीतकमी संसाधनांचा उपयोग करून शेतीतून जास्त उत्पन्न आणि नफा मिळवता येतो. “ॲक्वापाॅनिक्स”मध्ये अनैसर्गिक किवा रासायनिक खतांचा वापर न केल्याने ‘सेद्रिय’ शेती करणे सहज शक्य होते. ह्या पद्धतीचा उपयोग करून कमी ख्रचात मस्यशेती करता येते. मस्यशेतीच्या रूपात शेतकरी जास्त प्रथिने उत्पादित करत असल्याने जास्त नफ्याची शेती असेही “ॲक्वापाॅनिक्स”ला म्हणता येईल. ज्या प्रदेशामध्ये पावसावर अवलंबून ‘एक पीक’ पद्धतीने शेती केली जाते, तेथे “ॲक्वापाॅनिक्स”चा उपयोग करून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन मिळवता येऊ शकते. त्याचबरोबर, ‘शहरी शेती’मध्ये, जेथे कमी जागेमध्ये किवा गच्चीवर पिके घेतली जातात तेथेही “ॲक्वापाॅनिक्स”चा चांगला उपयोग होऊ शकतो.

ॲक्वापाॅनिक्सचे फायदे :-

“ॲक्वापाॅनिक्स”चा मुख्य उदेश मस्यशेतीतून जास्त उत्पादन घेणे हा असल्यास ह्याचे दोन मुख्य भाग होतात. १) झाडांचा उपयोग करून “ॲक्वापाॅनिक्स” करणे आणि २) झाडांच्या उपयोग न करता “ॲक्वापाॅनिक्स” करणे. झाडांचा उपयोग न करता “ॲक्वापाॅनिक्स” करण्याच्या पद्धतीला RAS (Recirculating Aquaculture System) असेही म्हणतात. RAS किवा रास-“ॲक्वापाॅनिक्स” मध्ये नत्र चक्रातून तयार झालेले नायट्रेट (NO3) झाडांचे पोषकद्रव्य (खत) म्हणून न वापरता हवेत नत्र वायूच्या स्वरूपात सोडून दिला जातो. ह्या पद्धती मध्ये झाडांचा समावेश नसल्याने ही पद्धत सोपी आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून सोपी मानली जाते. पण शाश्वत शेतीच्या विचारातून ही पद्धत तितकीशी योग्य नाही.

झाडांच्या लागवडीच्या पद्धतीवरून विचार करायचा झाल्यास “ॲक्वापाॅनिक्स” चे flood & drain, Deep water Culture (DWC), Nutrient Film Technique (NFT) इत्यादी प्रकार करता येतात. ऊर्जा खर्चाचा (लागणाऱ्या विजेचा) विचार केल्यास flood & drain ही पद्धत सर्वात किफायतशीर ठरू शकते.

  1. झाडांच्या आणि माशांच्या वाढीसाठी जास्त पोषक वातावरण मिळाल्याने कमी जागेत जास्त उत्पादन.
  2. पाणी आणि अन्नद्रव्याचा पुनर्वापर केल्याने कमी खर्च.
  3. वातावरण बदलाचा कमी परिणाम होत असल्याने वर्षभर उत्पादन.
  4. शाश्वत आणि सेद्रिय पद्धतीचा वापर केल्याने पर्यावरणपूरक शेती.
  5. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांसाठी उपयुक्त.

१ ] फिश टॅक :- २५ फूट लांब ,१८ फूट रुंद ५ फूट खोली असलेला एक लाख लिटर पाणी साठवण्यासाठी ५०० मायक्रोन चा शेततळ्याचा पेपर वापरला आहे .तळ्यात माश्यांच्या विष्टेतून तयार होणारा स्ल्च काढण्यासाठी पाईप ची बनवलेली ग्रीड वापरली आहे .या ग्रीड मध्ये मोटारच्या सहायाने पाणी भरून हवेची पोकळी काढून सायफन द्वारे तळातील स्ल्च ,स्ल्चटॅक मध्ये घेतला जातो .या तळ्यात साधारण 3 ते ४ हजार माश्याचे प्रोडक्शन घेऊ शकतो .

स्ल्चटॅक

२ ] स्ल्चटॅक :- सायफन मध्ये लावलेला पाईपचा फुग्या मध्ये स्ल्च पंपाने पाणी भरल्यानंतर हा पाण्याच्या प्रवाहात प्रेशर तयार करतो घेतो . व यामुळे तळ्यात असलेल्या ग्रीड ला ठराविक अंतरावर होल असल्याने तळ्यातील स्ल्च खेचला जातो . स्ल्चटॅक मधून १.५ HP च्या स्ल्च पंपाने स्ल्च ग्रो बेड मध्ये आणला जातो .

ग्रो बेड

३ ] ग्रो बेड :- ग्रो बेड बनवण्यासाठी आम्ही IBC अर्धे कट वापरले आहेत .या मध्ये झाडांच्या सपोर्ट साठी विटांचा चुरा व वरच्या लेअर ला वाळू टाकली आहे .या बेड मध्ये लावल्या रोपांच्या मुळानवाटे स्ल्च फिरवण्यासाठी फ्लड अँन्ड ड्रेन व यु ट्यूब सायफन बनवले आहेत . या बेड मध्ये केली .पपई व अंतर पिक म्हणून टोमॅॅटो,वाल ,काकडी यांसारखी रोपे लावली आहेत .

या बेड मध्ये लावलेल्या रोपांच्या मुळावर व विटांच्या तुकड्यांवर वाढलेल्या हेट्रोट्रोपिक ब्याक्टेरीया अमोनिया चे रुपांतर नायट्रेट मध्ये करून ते नायट्रेट रोपांच्या वाढीसाठी खत म्हणून वापरले जाते .या मुळे पाण्यातील अमोनिया कमी होहून पाणी पुन्हा सायफन द्वारे पुन्हा तळ्यात जातो .

फ्लड अँन्ड ड्रेन सायफन

या प्रकारे ग्रो बेड मधून पाणी फिरत असताना या पाण्यामध्ये हवेतील ऑक्सिजन मिक्स झाल्याने पाणी फ्रेश रहाते .या प्रकारच्या सिस्टीम मध्ये कमी जागेत जास्त माश्यांचे प्रोडक्शन काढले जाते .

माश्यांचे बगळे ,खंड्या यांसारख्या पक्ष्यानपासून संवरक्षण करण्यासाठी तळ्यावर बर्ड नेट लावली लागते .

या सिस्टीम मध्ये वापरलेले ब्लोअर व पाण्याच्या पंप हे टाईमर वर जोडले आहेत .
थ्री वे एअर स्प्रेडर
८ वे एअर स्प्रेडर

माश्यांना पाण्यात ऑक्सिजन स्प्रेड करण्यासाठी वरील एअर स्प्रेडर बनवले आहेत .

१ HP एअर ब्लोअर

वातावरणातील हवा खेचून घेऊन पाण्यामध्ये एअर स्प्रेडर च्या मदतीने माश्यांना ऑक्सिजन पुरवण्याचे काम अशा प्रकारचे ब्लोअर करतात .

तळ्यात सोडलेले माश्यांचे सिड

४ ] फीडिंग :- तळ्यातील माश्यांना त्यांच्या वजनाच्या ३ ते ४ % खाद्य टाकावे .त्या खाद्य चे प्रमाण व साहिज हि माश्यांच्या वाढीवर अवलंबून असते .साधारण FCR हा ० ते १ च्या दरम्यान असला पाहिजे .तळ्यामध्ये लवकर उत्पादन घेण्यासाठी तिलापिया ,कोई ,यांसारखे मासे चांगले उत्पादन मिळून देतात .या माश्यांच्या खाद्या वरील खर्च कमी करण्यासाठी आश्रमात आम्ही अॅझोला वाळून , आंबून , माश्यांना फीडिंग करुन त्यांच्या वजनातील फरकांचा अभ्यास करत आहोत .ब्लॅॅक सोल्जर फ्लाय च्या अळ्या वाढून माश्यांना फीडिंग करून त्यांच्या वजनात वाढ करता येऊ शकते .असे काही प्रयोग विज्ञान आश्रमातील फिश फार्मिंग प्रोजेक्ट मध्ये चालू आहेत.

चार महिन्याचा सिव्हर कार्प मासा

म्हांगुर मासा

६ ] माश्यांच्या हालचाली :- मासे तळ्यात पोहत असताना त्यांनी हलवलेल्या शेपटीच्या हालचालीमुळे पाण्यात तयार होणाऱ्यांना गोलाकार तरंग जेवढे मोठे तेवढे मासे मोठे आहेत असा अंदाज लावता येतो . पाण्याचे तापमान १८ ते २८ अंश सेल्सिअस असले पाहिजे .तापमान कमी असेल तर मासे खाद्य खात नाहीत .पाण्यातील अमोनिया 80 PPM पेक्षा जास्त असेल तरी मासे खाद्य खात नाहीत.पाण्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी असेल किव्हा लाईट गेली तर पाण्यातला ऑक्सिजन कमी झाला कि मासे खाद्य खात नाहीत व पाण्याच्या सरफेस वर येऊन ह्वेतील ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करतात .पाण्यामध्ये अमोनिया ,पाण्यातील ऑक्सिजन ,PH,तापमान ,या गोष्टी माश्या च्या जातीप्रमाणे सेट असतील तर फिशफार्मिंग करणे सोपे जाते

दोन माश्यांचे एकत्र फार्मिंग :- सध्या तळ्यात ६०० कोई मासा व १००० तिलापियाचे मासे असे दोन मासे एकत्र वाढवायचा प्रयत्न केला आहे. आम्ही मोनोसेक्स तिलापिया चे सिड आणले होते परंतु १०० gm चा झाल्यावर त्यांनी बिडिंग करण्यास सुरुवात केली .त्यामुळे मासे खाद्य खायचे पण माश्यांचे वजनात फारशी वाढ होत नव्हती साधारण तिलापिया ८० ते १०० रुपये kg मार्केट रेट असल्याने आम्हास त्यांना फीडिंग वर खर्च करणे शक्य नसल्याने आम्ही यामध्ये कोई मासा सोडला ,जेणेकरून तो तिलापियाने ब्रीड केलेली पिल्ले खाऊन वाढेल व कोईला मार्केट रेट २१० रुपये असल्याने चांगले उत्पादन मिलेले . तिलापियाला खाद्य म्हणून ५ kg शेन व २ kg गव्हाचा भुसा आठवड्यातून एकदा फीड करण्यास सुरुवात केली.कोई मासा सोडल्या नंतर तीन दिवसानंतर तिलापिया माश्यांची पिल्लांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसले .

कोई माश्यांची ट्रायल :- कोई माश्यांना बायोफ्लोक मध्ये वाढवणे ही ट्रायल घेण्यासाठी नवीन कोई माश्याचे सिड साधारण १इंच व ०.६० gm चे आणले ,या माश्यांना पाण्याचे PH :७ PPM ,तापमान :२८ सेल्सिअस , ,अमोनिया : ०.२५ पेक्षा कमी ठेऊन १००० लिटरच्या IBC टाकी मध्ये ठेवले.परंतु त्यातील काही पिल्ले मेली असल्याने आम्ही त्यांना ट्रीट्मेंट केली .

या पद्धतीने ट्रीट्मेंट केली .
कोई माश्यांचे सिड
मोठ्या माश्यांपासून लहान माश्यांचे संवरक्षण व्हावे यासाठी 3MM ची मच्छरदाणी ची बनवून पाण्यावर फ्लोट केलेली केज

माश्यांना ट्रीट्मेंट केली . त्यांना जास्त प्रोटीन फीड दिल्याने यकृताला काही त्रास होऊन मासे मरण्याची एक शक्यता असल्याने आम्ही त्यना २ ML लिव्हर टॉनिक दिले व मासे मोजून (१३४४ मासे ) दोन्ही केज मध्ये सोडले ,व दुसऱ्या दिवशी आॅक्झीटेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड ची गोळी पावडर करून खद्याला लाऊन दिली .