1. प्रस्तावना
- नैसर्गिक शेतीची गरज
- सजीव आणि सुपीक मातीचे महत्त्व
शेण, गूळ आणि बेसन - या पद्धतीमध्ये गाईचे शेण, गूळ आणि कडधान्याचे बेसन वापरून सूक्ष्मजीवांसाठी अनुकूल मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण काही दिवस सावलीत ठेवून नंतर पाण्यात मिसळून ओल्या जमिनीवर वापरले जाते. यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थ आणि उपयुक्त सूक्ष्मजीव वाढण्यास मदत होते.
- नैसर्गिक शेतीची गरज लक्षात घेऊन शाश्वत कृषी सूत्राचा वापर केला जातो.
- आवश्यक साहित्य :
- गावरान गाईचे शेण – 10 किलो
- गूळ – 3 किलो
- बेसन पीठ – 3 किलो
- कृती :
- वरील तिन्ही पदार्थ एकत्र करून चांगले मिसळावेत. हे मिश्रण एका ड्रममध्ये भरून ठेवावे. 3 दिवसांनंतर हे मिश्रण मातीमध्ये मिसळून तयार करावे आणि त्यानंतर जमिनीवर समान प्रमाणात शिंपडावे. ही प्रक्रिया 10 दिवसांच्या अंतराने एकूण 3 वेळा करावी.
या practical मध्ये विद्यार्थ्यांनी गाईचे शेण, गूळ आणि कडधान्याचे बेसन यांचा वापर करून culture तयार केले. साहित्याचे योग्य प्रमाण घेणे, गूळ पाण्यात विरघळवणे, बेसनाची पेस्ट तयार करणे आणि ती शेणामध्ये व्यवस्थित मिसळणे ही संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी स्वतः करून पाहिली. - या activity मधून विद्यार्थ्यांना नैसर्गिक शेती, सेंद्रिय पदार्थांचे महत्त्व, सूक्ष्मजीवांची भूमिका आणि culture तयार करण्याची प्रत्यक्ष पद्धत समजली.
- ही hands-on activity विद्यार्थ्यांसाठी “करून शिकणे
9/9/2026



18/9/2026
विद्यार्थ्यांकडून दुसरी त्रिसूत्री तयार करून घेतली आहे, लवकरच ती जमिनीवर व केळीच्या बागेत टाकण्यात येईल.



22/09/2026
तयार केलेले कल्चर जमिनीवर फवारणी करण्यात आले.



दुसरी त्रिसूत्री जमिनीमध्ये टाकल्यानंतर जमिनीत गांडुळांची वाढ झालेली दिसून आली. यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन आणि जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होऊ शकते.

6/10/2026
विद्यार्थ्यांकडून तिसरी त्रिसूत्री तयार करून घेतली. तयार केलेली त्रिसूत्री लवकरच जमिनीवर आणि केळीच्या बागेत टाकण्यात येईल. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नैसर्गिक शेती, सेंद्रिय पदार्थांचे महत्त्व आणि त्रिसूत्री तयार करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

