अझोला म्हणजे काय?
अझोला ही एक जलवनस्पती (पाण्यात वाढणारी वनस्पती) असून ती Azollaceae कुळातील आहे. तिचा वापर प्रामुख्याने शेती आणि पशुखाद्य म्हणून केला जातो. अझोला ही अत्यंत जलद वाढणारी, शाकाहारी आणि नायट्रोजन स्थिरीकरण करणारी वनस्पती आहे.
अझोला चे महत्त्व:
- ✅ नायट्रोजन स्थिरीकरण: अझोलाच्या मुळांमध्ये Anabaena नावाची निळ्या-हिरव्या शैवळ (cyanobacteria) राहते, जी हवेतील नायट्रोजन स्थिर करते. त्यामुळे अझोला ही नैसर्गिक खत म्हणून वापरली जाते.
- ✅ पशुखाद्य: गायी, म्हशी, शेळ्या, डुकरं, कोंबड्यांसाठी अझोला उत्तम पौष्टिक चारा आहे. यात प्रथिने, खनिजे, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.
- ✅ शेतीस पूरक: भातशेतीत अझोला वापरल्यास नायट्रोजनची गरज कमी होते आणि मातीची सुपीकता वाढते.
- ✅ पर्यावरणपूरक: ही वनस्पती सेंद्रिय शेतीस पूरक असून रासायनिक खतांवर अवलंबन कमी करते.
अजोला विषयी तुलनात्मक माहिती मिळवण्यासाठी ४ अजोला बेड तयार केले आहेत आणि प्रत्येक बेडवर वेगवेगळे निकष वापरून डेटा गोळा करायचा आहे.
या कामामध्ये आपल्याला एक नवीन अजोला बेड तयार करायचा होता. त्यासाठी आधी त्या बेडमधील पाणी बाहेर काढले. नंतर त्या बेडमध्ये 10 सें.मी. थर येईल इतकी माती टाकायची होती, पण 100 किलो माती टाकली. त्यानंतर उरलेल्या 3 ट्रेमधील पाणी हलक्या हाताने ढवळले आणि त्यातील शेवाळ (algae) काढून टाकले. नंतर त्या 3 ट्रेमधील पाण्याचा pH तपासला.”

या ३ बेडचा pH दोन दिवसांनी एकदा तपासत होतो, पाणी हलके ढवळणे सुरू ठेवले होते आणि अजोला कसा आहे याची नोंद करून ठेवली.
1) बेड तयार करणे
सर्वप्रथम, एका प्लास्टिक बेडमध्ये १०० किलो माती भरली. त्यानंतर त्या बेडमध्ये ३०० लिटर पाणी भरले गेले जेणेकरून अॅझोलाला योग्य आर्द्रता मिळेल.2
2) पाण्याची गळती व दुरुस्ती
पाणी भरल्यानंतर लक्षात आले की बेडमधून एका कोपऱ्यातून गळती होत होती, आणि त्यामुळे सुमारे १०० लिटर पाणी वाया गेले. ही गळती ओळखून त्या भागातून पाणी बाहेर जाऊ नये म्हणून योग्य प्रकारे सीलिंग करून गळती थांबवली.
3) पाण्याची पातळी पुन्हा वाढवणे
गळती थांबल्यानंतर पुन्हा १०० लिटर पाणी भरले गेले, त्यामुळे बेडमधील पाण्याची पातळी पुन्हा ३०० लिटर झाली.
4) अॅझोला टाकणे
पाण्याची योग्य पातळी आल्यावर त्या बेडमध्ये १.५ किलो अॅझोला संस्कृती टाकण्यात आली. ही संस्कृती ४–५ दिवसांत बेडच्या पृष्ठभागावर पसरते व चांगली वाढ होते.

अॅझोलाच्या वाढीसाठी पाण्याचा pH नियंत्रण –
अॅझोला ही अन्नद्रव्यांनी भरपूर असलेली एक जलवनस्पती आहे, जिला योग्य वाढीसाठी विशिष्ट वातावरणाची गरज असते. यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाण्याचा pH स्तर. योग्य pH नसेल तर अॅझोलाची वाढ थांबते किंवा संथ होते. खाली दिलेला अनुभव तुम्हाला तुमच्या अॅझोला बेडमध्ये pH योग्य ठेवण्यासाठी मार्गदर्शन करेल.
दर दोन दिवसांनी pH तपासणी-
अॅझोला बेड तयार झाल्यानंतर, आम्ही प्रत्येक दोन दिवसांनी पाण्याचा pH तपासण्यास सुरुवात केली. हे सातत्याने निरीक्षण करणे गरजेचे होते, कारण अॅझोलाची वाढ हे पाण्याच्या pH वर अवलंबून असते.
7.5 पेक्षा जास्त pH – अयोग्य स्थिती
तपासणी दरम्यान लक्षात आले की प्रत्येक वेळी पाण्याचा pH 7.5 पेक्षा जास्तच होता. हे pH स्तर अॅझोलाच्या योग्य वाढीसाठी अयोग्य आहे. जास्त alkaline पाणी अॅझोलाची वाढ मर्यादित करू शकते आणि त्यामुळे उत्पादन घटते.
योग्य पातळी राखण्यासाठी उपाय-
हे लक्षात घेतल्यानंतर, आम्ही सर्व बेडमधील पाण्याचा pH नियंत्रित केला. Phosphoric acid टाकून आम्ही pH 6.5 ते 7.0 दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न केला, जो अॅझोलाच्या वाढीसाठी योग्य मानला जातो.
PH Table-
Sample No. | pH Reading (Before Adding Phosphoric Acid) | Water Type (Based on pH) |
---|
Sample 1 | 7.8 | Alkaline |
Sample 2 | 7.5 | Alkaline |
Sample 3 | 8.0 | Alkaline |
Sample 4 | 8.0 | Alkaline |
अॅझोला बेडमध्ये pH नियंत्रणासाठी फॉस्फोरिक अॅसिड (H₃PO₄) चा वापर –
बेड क्र. | 1 लिटर पाण्याचा pH सॅम्पल नंतर टाकलेले H₃PO₄ (ml) | पूर्ण बेडसाठी टाकलेले H₃PO₄ (ml) |
---|---|---|
बेड 1 | 0.2 ml | 50 ml |
बेड 2 | 0.1 ml | 30 ml |
बेड 3 | 0.1 ml | 60 ml |
बेड 4 | 0.2 ml | 50 ml |
स्पष्टीकरण:
- 1 लिटर सॅम्पलवर आधारीत प्रमाण प्रत्येक बेडमधून 1 लिटर पाण्याचा सॅम्पल घेऊन त्यावर pH मोजण्यात आला आणि त्यानुसार फॉस्फोरिक अॅसिडचे प्रमाण ठरवण्यात आले.
- पूर्ण बेडसाठी प्रमाण त्या प्रमाणाच्या आधारे संपूर्ण बेडमध्ये योग्य तेवढे H₃PO₄ टाकून pH संतुलित केला. 07/07/2025 TO 08/07/2025
- रविवारी झालेल्या चर्चेमध्ये असे ठरवले की अझोला चे ३ बेड चांगल्या पद्धतीने वाढवायचे आहेत. त्यासाठी आधी जुने अझोला काढून (harvest करून) त्या प्रत्येक बेडमध्ये १०० किलो माती भरायची आणि बेड पुन्हा तयार करायचा. या कामासाठी सुरुवात केली.
- उरलेले २ अझोला बेड आज काढून घेतले आणि त्यातील पाणी निघून जाण्यासाठी त्याला प्रवाही अवस्थेत (चालनात) ठेवले. पाणी निघून गेल्यावर अर्ध्या तासाने तो अझोला प्लास्टिकच्या ट्रेमध्ये काढून घेतला आणि गायांना खायला भानुदास सरांकडे दिला.

सर्व अझोला बेडचे हार्वेस्टिंग केल्यानंतर लक्षात आले की काही बेडमध्ये मातीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अझोला वाढीस आवश्यक असलेले पोषणमूल्य उपलब्ध होत नव्हते आणि त्याचा परिणाम अझोला वाढीवर होत होता. त्यामुळे निर्णय घेण्यात आला की प्रत्येक अझोला बेडमध्ये अतिरिक्त माती भरावी. त्यानुसार प्रत्येक बेडमध्ये ५० किलो चालून घेतलेली माती भरण्यात आली, जेणेकरून मोठे दगड येणार नाहीत आणि अझोलाच्या वाढीस योग्य पोषणमूल्य मिळेल.
18/07/2025 प्रत्येक आजोला बेडमध्ये माती भरल्यानंतर त्यामध्ये पाण्याची पुरेशी पातळी राखण्यासाठी आणि आजोला वाढीस आवश्यक असलेले आर्द्रता व पर्यावरणीय स्थिती निर्माण करण्यासाठी प्रत्येकी सुमारे ३०० किलो पाणी भरण्यात आले, जेणेकरून माती ओलसर राहील, सूक्ष्मजीवांची क्रिया सुरळीतपणे सुरू राहील आणि आजोला सुसंगत व संतुलित वातावरणात जोमाने वाढू शकेल.

यानंतर प्रत्येक आजोला बेडमध्ये स्वतंत्रपणे १ किलो आजोला कल्चर सोडण्यात आले, जेणेकरून प्रत्येक बेडमध्ये आजोला ची वाढ सुरळीत आणि सम प्रमाणात होईल, तसेच पूर्वी झालेल्या उत्पादनातील घट लक्षात घेता वाढीस चालना मिळावी आणि संपूर्ण बेडमध्ये एकसंध आणि आरोग्यदायी आजोला विकसित व्हावा हाच उद्देश होता.
