09/09/2025

“दत्ता येडे हे कवठे गावचे शेतकरी आहेत. त्यांचा माझ्याशी संपर्क आला आणि त्यांच्याकडे पेरूची शेती आहे. त्यामुळे त्यांना पेरूवर प्रक्रिया करून पेरू पावडर आणि पल्प तयार करणे आवश्यक आहे. या संदर्भात चर्चा झाली असून, त्यासाठी आम्ही त्यांच्याकडून पेरू मागवले आहेत.”

त्या शेतकऱ्याने आम्हाला ग्रेड 1 चे 22.884 किलो आणि ग्रेड 2 चे 18 किलो असे पेरू दिले.

ट्रायल सुरू करण्यापूर्वी इलेक्ट्रिक ड्रायरसाठी नवीन सब मीटर बसवला. तो नीट काम करतोय का हे तपासून घेतल्यानंतर प्रत्यक्ष ट्रायलची सुरुवात केली.

पेरूची पूर्वतयारी

सर्वप्रथम पेरूंना स्वच्छतेसाठी क्लोरीन पाण्यात 10 मिनिटे भिजत ठेवले. यामुळे त्यांचे डिसइन्फेक्शन होऊन स्वच्छ फळे मिळाली. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले.

यावेळी काही पेरूंचे बाहेरील खराब भाग होते ते काढून टाकले. नंतर पेरूंना चार भागांत कापले, ज्यामुळे आतला गर वेगळा करणे सोपे गेले. गर बाजूला ठेवला आणि बाहेरील साल वेगळ्या बाजूला काढून ठेवली.

किसणी प्रक्रिया

पुढील टप्प्यात पेरू किसण्याचे काम झाले. यासाठी स्लायसर मशीनचा वापर केला. सर्व पेरू किसून झाल्यानंतर त्यांचे वजन 18 किलो नोंदले गेले. किसताना बाहेर निघालेला गर 3.330 किलो एवढा होता, तर कचरा (waste) सुमारे 440 ग्रॅम निघाला.

ट्रे मध्ये पसरणे

किसलेले पेरू स्वच्छ ट्रेमध्ये पसरवले गेले, ज्यामुळे ड्रायरमध्ये ठेवताना समतोलपणे वाळवण्याची प्रक्रिया होऊ शकेल.

ग्रेड 1 पेरू : 22.884 किलो

प्रक्रिया टप्पे

एकूण पेरूतून गर : 3.330 किलो

पेरू किसल्यानंतर : 18 किलो

किसण्याचे एकूण वजन : 17.800 किलो

वाळवणीनंतर अंतिम वजन : 2.416 किलो

किसताना निघालेला कचरा : 440 ग्रॅम

LOD: 90%

Drying time:15.20min

Electricity used:19.16Units

Per hour electricity used:1.25unit

Total moisture removed:86.57%

पावडर केल्यानंतरचे वजन:2.5kg

15/09/2025

आपण वाळवलेला पेरू फ्लेक्स मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर तयार केली. ही पावडर फक्त साठवणुकीसाठीच नाही, तर विविध नवीन उत्पादने तयार करण्यासाठीही उपयुक्त आहे.

याच विचाराने आपण या पावडरवर प्रयोग सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी दत्ता येडे सरांना बोलावून घेतले आणि पहिला प्रयोग म्हणून पेरू पावडरपासून लस्सी बनवण्याचा निर्णय घेतला.

लस्सी तयार करून तिची पहिली चाचणी घेतली. चव, रंग आणि सुगंध यांचा अनुभव घेतल्यानंतर लक्षात आले की पेरू पावडरचा उपयोग करून लस्सीत पेरूचा वास किंवा सुगंध जास्त प्रमाणात येत नाही.

लस्सीची चव साधारणपणे नेहमीच्या लस्सीसारखीच वाटली. मात्र अपेक्षित असा पेरूचा सुगंध जाणवला नाही.