अनुक्रमणिका

१. मोरिगा चिक्की

२. मोरीनगा शेव

३. मोरिनगा लाडू ( मनुके खजूर)

४. चिंच खजूर सॉस

५. छोले मसाला

६. पावभाजी मसाला

७. नाचणी लाडू

८. शेंगदाणे लाडू

९. बाजरी लाडू

१०. नान कटाई

११. इन्स्टंट गाजर हलवा

१२. सोयाबीन फुटाणे

१३. एलोवेरा बर्फी

१४. इन्स्टंट इडली

१५. पपया बॉल

१.  मोरिंगा चिक्की

साहित्य: मोरिंगा पाऊडर- २० ग्रॅम,

        शेंगदाणे- २०० ग्रॅम ,

        तीळ- १२० ग्रॅम,

        जवस- ८० ग्रॅम,

        गूळ- ४०० ग्रॅम,

        तूप- २५ ग्रॅम

साधने : गॅस, कडई, मिक्सर्,  चिक्की ट्रे, लाटणे, कटर, उलतणे, पॅकिंग बॉक्स,

कृती:

  • प्रथम शेंगदाणे, तीळ, जवस मोजून घेऊन निवडून घेणे.
  • शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मध्यम आचेवर भाजू
  • भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मिक्सर् मध्ये बारीक करून घेणे, आणि मिश्रण एकत्र करणे.
  • मिश्रणामध्ये मोरिंगा पाऊडर घालून, मिक्सर् च्या मदतीने एकत्र करणे.
  • जेवढे मिश्रण तयार होईल, तेवढा गूळ चिरून घेणे.
  • चिक्की ट्रे, कटर आणि लाटण्याला तूप लावून घेणे.
  • कडई मध्ये मध्यम आचेवर गूळ वितळवून घेणे.
  • वितळलेल्या गुळा मध्ये उरलेले तूप आणि मोजून घेतलेले मिश्रण घालून एकत्र करणे.
  • तयार झालेले चिक्की चे मिश्रण चिक्की ट्रे वर घालून लाटण्या च्या मदतीने लाटून घ्या.
  •  सजवण्या साठी वरुण थोडे तीळ लावा आणि कटर च्या मदतीने चिक्की कापून घेणे.
  • तयार झालेली चिक्की बॉक्स मध्ये पॅक करणे

२. मोरिंगा शेव

साहित्य: मोरिंगा पाऊडर- १० ग्रॅम,

       बेसन पीठ – ८५ ग्रॅम.  

       हळद –१ ग्रॅम.

       मीठ- २ ग्रॅम .

       तेल- २० ग्रॅम .

साधने : गॅस, कडई, झारा, शेव करण्याचा साचा, टिशू पेपर, पॅकिंग मटेरियल,ई.

कृती :

  • सर्व साहित्य मोजून घ्या आणि पानी घालून मळून घ्या.
  • कडई मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणे.
  • शेव करण्याच्या साच्याला आतुन तेल लाऊन घेणे.
  • साच्या मध्ये शेवेचे पीठ भरणे.
  • गरम झालेल्या तेलामध्ये साच्या च्या मदतीने शेव पाडणे.
  • मध्यम आचेवर शेव तळून घ्या.
  • शेव टाळून झाल्यावर झाऱ्या च्या मदतीने तेलातून काढा .
  • शेव गर झाल्यावर पोऊच मध्ये सील करा.

३. मोरिंगा लाडू (मनुका खजूर )

साहित्य: मोरिंगा पाऊडर- २० ग्रॅम,

        शेंगदाणे- २०० ग्रॅम ,

        तीळ- १२० ग्रॅम,

        जवस- ८० ग्रॅम,

        मणूके – ३६०  ग्रॅम,

        खजूर – ४०  ग्रॅम

        तूप – १० ग्रॅम ( इच्छेनुसार)

        वेलची पाऊडर- ५ ग्रॅम

साधने : गॅस, कडई, मिक्सर्, उलतणे, पॅकिंग बॉक्स,

कृती :

  • प्रथम शेंगदाणे, तीळ, जवस, मणूके, खजूर मोजून घेऊन निवडून घेणे.
  • शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मध्यम आचेवर भाजून घेणे.
  • भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मिक्सर् मध्ये बारीक करून घेणे, आणि मिश्रण एकत्र करणे.
  • मिश्रणामध्ये वेलची पाऊडर, मोरिंगा पाऊडर, निवडलेली खजूर, मणूके घालून, मिक्सर् च्या मदतीने एकत्र करणे.
  • तयार झालेले मिश्रण तूप घालून लाडू वळून घेणे.

४. चिंच खजूर सॉस

साहित्य: निवडलेली चिंच – १२५० ग्रॅम

        निवडलेली खजूर – १२५० ग्रॅम  

        साखर – ३ किलो

        काले मीठ- ३० ग्रॅम

        साधे मीठ – ३० ग्रॅम

        लाल तिखट – २० ग्रॅम

        चाट मसाला – १५ ग्रॅम

        गरम मसाला – १५ ग्रॅम

        साइटरिक अॅसिड – २ ग्रॅम

        सोडियम बेणजोइट- ९ ग्रॅम

साधने : गॅस, वजन काटा, मिक्सर्, पुरण वाटण्याची चाळण, पॅकिंग मटेरियल,ई.

कृती :

  • निवडलेली चिंच आणि खजूर मोजून घ्या, चिंच २ वेळा पानी वापरुन धुवून घ्या .
  • २.५ लीटर पानी घालून धुतलेली चिंच आणि खजूर १५ मिनिटे शिजवून घ्या. थंड करून घ्या .
  • थंड झालेल्या मिश्रणामध्ये २ .५ – ३ लीटर गरजेनुसार पानी घाला आणि मिक्सर् मध्ये वाटून घ्या.
  • वाटलेले मिश्रण पुरण वाटण्याच्या चाळणीने गाळून घ्या.
  • तयार झालेल्या मिश्रणामध्ये मोजून घेतलेली साखर आणि मसाले घालून उखलवून घ्या.
  • उखळी आल्याननंतर थोडा सॉस एक वाटीमद्धे काढून त्या मध्ये सोडियम बेणजोइट, साइटरिक अॅसिड घाला आणि फेटून घ्या .
  • तयार झालेली पेस्ट, सॉस मध्ये घालून उखलवून घ्या.
  • तयार झालेला सॉस थंड झाल्यानंतर पोऊच मध्ये सील करा.

६. छोले मसाले

साहित्य: कसूरी मेथी-५० ग्रॅम

        लाल मिरची-७५ ग्रॅम

        धने-१०० ग्रॅम

        दालचीनी-२५ ग्रॅम

        मोठी वेलची-२० ग्रॅम

        जीर्-५० ग्रॅम

        तमालपत्र-१५ ग्रॅम

        मीठ-२५ ग्रॅम

        कॉळे मीठ-२५ ग्रॅम

        आमचूर पा-५० ग्रॅम

        सुंठ-१५ ग्रॅम

        मीर पावडर-५० ग्रॅम 

कृती:

१. सर्व मसाले मोजून घ्या.

२. पाऊडर असणारे मसाले वेगळे काढा.

३. सुंठ सोडून सर्व खडे मसाले कडई मध्ये गरम करा.

४. सर्व मसाले मिक्सर् मध्ये बारीक करून घ्या आणि एकत्र करून घ्या

७. पावभाजी मसाला

साहित्य: लाल मिरची-२५० ग्रॅम

        धने-१०० ग्रॅम

        साखर-५० ग्रॅम

        मीठ-५० ग्रॅम

        आमचूर-२५ ग्रॅम

        दालचीनी-५० ग्रॅम

        जीरे पावडर-५० ग्रॅम

        लवंग-१० ग्रॅम

        काले मिरे-५ ग्रॅम

        तमाल पत्र-१० ग्रॅम

        मसाला वेलची-१० ग्रॅम

कृती:

१. सर्व मसाले मोजून घ्या.

२. पाऊडर असणारे मसाले वेगळे काढा.

३. सुंठ सोडून सर्व खडे मसाले कडई मध्ये गरम करा.

४. सर्व मसाले मिक्सर् मध्ये बारीक करून घ्या आणि एकत्र करून घ्या

८. नाचणीचे लाडू

साहित्य: नाचणी चे पीठ -६०० ग्रॅम

       गूळ पावडर-२६० ग्रॅम

       तूप- २५० ग्रॅम

       इलाईची पावडर – ८ ग्रॅम

कृती :

१. कडई तापवून घ्या आणि नाचणी चे पीठ कमी आचेवर, थोडे थोडे तूप टाकून भाजून घ्या.

२. पीठ भाजल्या नंतर खमंग वास येतो

३. भाजलेले पीठ पराती मध्ये ठेवून , त्यामध्ये वजन करून घेतलेली गूळ पाऊडर, उरलेले तूप आणि वेलची पाऊडर घालून मिक्स करा .

४. तयार झालेल्या मिश्रणाचे लाडू बांधून घ्या.

९. शेगदाणे लाडू

साहित्य: शेगदाणे-१ किलो 

        गूळ- ६०० ग्रॅम

        तूप- ७५ ग्रॅम

        वेलची- ८ ग्रॅम 

कृती

१. मध्यम आचेवर शेंगदाणे भाजून घ्या.

२. गूळ कापून घ्या.

३. शेंगदाणे बारीक करून घ्या .

४. बारीक केलेल्या शेंगदाण्याच्या कुटामद्धे , बारीक केलेला गूळ, वेलची पाऊडर घाला आणि मिक्सर् वापरुन मिक्स करून घ्या.

५. बारीक केलेल्या मिश्रणामध्ये तूप वितळवून मिक्स करा आणि लाडू बांधून घ्या.

१०. बाजरीचे लाडू

साहित्य: बाजरीचे पीठ- २०० ग्रॅम

        तीळ- १८० ग्रॅम

        जवस- १२० ग्रॅम

        मगज बी- १२० ग्रॅम

        इलाईची पावडर- १० ग्रॅम

        तूप- ८५ ग्रॅम

        गूळ- ६०० ग्रॅम

कृती:

१. मोजून घेतलेले बाजरीचे पीठ, तीळ, जवस, मगज बी, वेगवेगळे मंद आचेवर भाजून घ्या.

२. तीळ, जवस, मगज बी वेगवेगळे मिक्सर् ला बारीक करून घ्या.

३. भाजलेले पीठ, आणि बारीक केलेले कूट एकत्र करून मिक्सर् मध्ये बारीक करून घ्या.

४. लाडू करण्या साठी, मध्यम आचेवर गूळ वितळवून घ्या .

५. वितळलेल्या गुळामद्धे तूप, वेलची पाऊडर, आणि तयार झालेले मिश्रण टाकून परतून घ्या.

६. लाडू बांधून घ्या

११. नान कटाई

साहित्य: मैदा- ५०० ग्रॅम

       पिठी साखर- ३५० ग्रॅम 

       डालडा- ३५० ग्रॅम

       फ्लेवर- ५ ml

       कलर- ३ ml

कृती:

१. सर्व साहित्य मोजून घ्या .

2. मोजून घतेलेले डालडा हातानी फेटून घ्या .

3. फेटून घेतलेल्या डाळद्यामधे चालून घेतलेला मैदा , पिठी साखर , फ्लेवर, आणि कलर घालून मिक्स करा .

4. नीट मळून घ्या

5. नान कटाई शेपर नी आकार देऊन घ्या .

6. ओवन 100 डिग्री सेलसि ला 10 मिनिट प्रीहीट करा आणि 180 डिग्री ला 15-20 मीन बेक करा

१२. इन्स्टंट गाजर हलवा

साहित्य:

गाजर

        पिठी साखर

        वेलची पाऊडर

       सुखा मेवा

कृति:

१. गाजर धुवून वजन करून घ्या .

२. पिलर नी साल आणि बुडके काढून घ्या.

३. अर्धे कापून कूक्कर मध्ये १० – १५ मिनीट अर्धे शिजवून घ्या.

४. अर्धवट शिजलेले गाजर , खिसून घ्या आणि ड्रायर मध्ये ड्राय करा.

५. १०० ग्रॅम इन्स्टंट गाजर हलवा प्रेमिक्स तयार करण्या साठि-

ड्राय गाजर – ४० ग्रॅम

साखर – ५५ ग्रॅम

सुखामेवा – ४ ग्रॅम

वेलची पाऊडर – १ ग्रॅम

# हलवा तयार करण्या साठी-

१. २१० मिलि दूध उखलवून घ्या .

२. उखळलेल्या दूधमद्धे १०० ग्रॅम इन्स्टंट गाजर हलवा प्रेमिक्स टाका.

३. ५ मिनिट शिजवून घ्या .

     

१३. सोयाबीन फुटाणे

साहित्य :

सोयाबीन

बारीक मीठ

कृती:

१. सोयाबीन १२ तास भिजवून घ्या.

२. भिजलेले सोयाबीन १.५- २ तास पंख्या खाली सूती कपड्यावर सुखत घाला.

३. कडई मध्ये बारीक मीठ गरम करून घ्या आणि सुखलेले सोयबिन थोडे थोडे घेऊन मध्यम आचेवर भाजून घ्या

४. भाजण्या साथी १५-२० मीन लागतात.

५. भाजून झालेल्या सोयाबीन ला मिठातून काढण्या साठी झारा कीव चाळणी चा वापर करा.

१४. अलोवेरा बर्फी

साहित्य:

दूध – 2.5 लिटर

साखर – 500 ग्रॅम

वेलची पाऊडर – 4 ग्रॅम

कोरफड गर – 1.1 किलो

तूप – 50 ग्रॅम

कृती:

१ . कोरपडीची पाने स्वच्छ धुवून वजन करून घ्या.

२. कोरपडीच्या पानांच्या कडा कापून थोडा वेळ पाने उभी करून ठेवा.

३. कोरपडीच्या पानं मधून गर काढून घ्या आणि मिळालेला गर २-३ वेळ गरम पानी वापरुन धुन घ्या .

४. गराचे छोटे तुकडे कापून घ्या .

५ कडई मध्ये दूध आणि साखर उखलवत ठेवा .

६. उखळी आल्यावर त्यात कोरफड गर घाला आणि सतत हलवा.

७. खवा होत आल्यावर त्यात तूप आणि वेलची घाला.

८. तयार झाल्यानंतर तूप लावलेल्या भांड्या मध्ये काढा आणि आकार दय .

१५. इन्स्टंट इडली

साहित्य:

तांदूळ – १०० ग्रॅम

उदित डाळ् – ५० ग्रॅम

बेकिंग सोडा –

सायत्रीक अॅसिड –

मीठ –

कृती :

१. तांदूळ आणि डाल १२ तास भिजवा आणि १२ तासानंतर मिक्सर् मध्ये वाटून घ्या .

२. तयार झालेले मिश्रण ४० डिग्री ला ८ तास फेरमेन्ट करा.

३. अंबवलेल्या पीठाची अॅसिडिटी चेक करा .

४. पीठ ड्रायर मध्ये ७५ – ८० डिग्री ला ड्राय करा .

५. ड्राय केलेले पीठ मिक्सर् मध्ये दळून घ्या.

६. प्रेमिक्स तयार करण्या साठी –

पीठ – ५० ग्रॅम ‘

मीठ – १.५ ग्रॅम

सायत्रीक अॅसिड – ०.१३ ग्रॅम ( ०.२५ मोल )

बेकिंग सोडा – ०.२५ ग्रॅम ( ०.२५ मोल )

# इडली तयार करण्या साठी –

१. इडली च्या पात्राला तेल लावून घेणे आणि प्रीहीट साथी ठेवणे

२. ५० ग्रॅम इडली प्रेमिक्स साठी ९० मिलि पानी वापरुन मिश्रण तयार करणे

३. ओले केलेले पीठ ५ मिनीट च्या आत शिजयला ठेवणे

४. मिश्रण इडली पात्रात घालून १५ मिनीट मध्यम आचेवर वाफवून घेणे

१६. पपाया बॉल

साहित्य:

कच्ची पपई खिस – १ किलो

साखर – ७५० ग्रॅम

दूध पाऊडर -५० ग्रॅम

डेसीकेटेड कोकोनट – १५० ग्रॅम

सुखामेवा – २० ग्रॅम

ईसेनस

कृती:

१. कच्ची पपई धुवून , तिची साल काढून घ्या , आतील बिया काढून , पपई खिसून घ्या.

२. खिसलेली पपई मिक्सर् मध्ये टाकून बारीक करा .

३. पपई चा गर , साखर टाकून शिजवायला ठेवणे .

४. थोडे पानी आठत आल्यावर त्यामध्ये दूध पाऊडर आणि ५० ग्रॅम डेसीकेटेड कोकोनट आणि सुखामेवा टाकून शिजवा.

५. पानी पूर्ण आठल्यावर गॅस बंद करणे आणि २ मिलि ईसेनस घालणे

६. थंड झाल्यानंतर हातानी बॉल करणे आणि डेसीकेटेड कोकोनट मध्ये घोळसून काढणे

७. पेपर मोल्ड मध्ये ठेवणे