१) पिकांच्या वाढीसाठी व आरोग्यासाठी पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. नायट्रोजन हे सर्वात महत्त्वपूर्ण पोषक घटकांपैकी एक आहे आणि जास्तीत जास्त उत्पादनापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे, परंतु इतर पोषक द्रव्यांसह ते संतुलित असणे आवश्यक आहे.

२) नायट्रोजनचा अभाव किंवा जास्त प्रमाणात उपयोग केल्यास उत्पादन आणि गुणवत्ता कमी होऊ शकते (आणि पिकांना नुकसान होऊ शकते). (कारण काही नायट्रोजन हा अमोनिकल स्वरूपात असतो, जर तो अमोनिकल स्वरूपातील नायट्रोजन जास्त प्रमाणात झाला तर पिकांना अमोनिया ची विषबाधा होते. तसेच काही नायट्रोजन हा नाईट्रेट स्वरूपात असतो. जर तो जास्त प्रमाणात झाला तर पिकांची पाने करपली जातात. त्यामुळे पिकांना स्ट्रोक येऊ शकतो).

३) नायट्रोजन वापर कार्यक्षमता (Nitrogen Uptake Efficiency): पिकांच्या उच्च नत्र (शाखीय वाढ अवस्थेत) मागणीच्या कालावधीत पुरेशी प्रमाणात नत्र असणे आवश्यक आहे. तसेच शाखीय वाढ कमी असताना नत्र कमी प्रमणात देणे आवश्यक आहे. रासायनिक खताद्वारे नायट्रोजन सहसा सोडले जाते किंवा दिले जाते (युरिया, 13:0:45, 10:26:26).

४) बायोस्लरी हे रासायनिक खतांना एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

५) बायोस्लरी मध्ये पिकांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असल्याने, पीकांचे उत्पादन वाढीसाठी आणि मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयोगात येते.

६) अभ्यासामध्ये असे दिसून येते की बायोस्लरीची पौष्टिक रचना (अन्नद्रव्य) भिन्न असतात आणि ती बायोग्यास मध्ये टाकण्यात येणारे घटक , बायोग्यास सयंत्र प्रकार आणि सयंत्रची कुजवण्याची प्रक्रिया ह्यावर अवलंबून असते. असे असले तरी बायोस्लरी केवळ N, P, K, Ca, Mg आणि Fe, Cu, Zn सारख्या खनिज धातूंमध्ये आणि सेंद्रिय पदार्थांमध्ये देखील समृध्द असते , त्याच बरोबर त्यामध्ये वेगवेगळी पोषक Amino Acids, जिवाणू सुद्धा मोठ्या प्रमणात असतात.

७) डुक्कराची बायोस्लरी ही लोह आणि अल्लुमिमियमने समृद्ध असू शकते आणि त्यात Zn, Cu, आणि Mn ची कमी प्रमाणात असू शकते. तर Pb आणि Mo अल्प प्रमाणात आढळून येते.

७) प्राणवायू विरहित पचनानंतर नायट्रोजन पातळी बायोस्लरीद्वारे पुन्हा वाढवली जाऊ शकते, आणि पोटॅशियमची उपलब्धता वाढण्यास मदत होते.

८) घट्ट आणि द्रव स्वरूपातील बायोस्लरी मध्ये अन्नद्रव्या वेगवेगळ्या प्रमाणात असतात.

९) ताजी बायोस्लरी (पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने) पोषक तत्वांमध्ये कमी असू शकते. तर उन्हामध्ये वाळलेल्या बायोस्लरीमध्ये कार्बन:नायट्रोजन (C:N गुणोत्तर) प्रमाण कमी असते (कारण बिओस्लरीमध्ये असणारा अमोनिकल नायट्रोजन बिओस्लरी उन्हामध्ये वळत असताना हवेमध्ये जातो त्यामुळे कार्बन आणि नायट्रोजनचे गुनोत्तर बदलते.) १०) रासायनिक खतांच्या तुलनेत, बायोस्लरी हळुवार प्रक्रियेत विघटित होते . हा बायोस्लरी चा एक उत्तम गुण म्हणता येईल.

११) बायोस्लरीच्या वापरामुळे नायट्रेट वाहून जाण्याची जोखीम कमी होते आणि नायट्रस ऑक्साईड हवेमध्ये जाण्याचे प्रमाण कमी होते व उत्पादन वाढते.

१२) शेण खाताची एकूण नायट्रोजन एकाग्रता बायोस्लरी पेक्षा 30% कमी असू शकते (कारण बिओस्लरी मधील मिथेन हा वायू आपण काढून तो गॅस म्हणून वापरतो त्यामधून थोडा कार्बन बाहेर पडतो त्याच बरोबर त्यामधून कार्बन डायऑक्साईड वायू सुद्धा बाहेर पडतो. ही प्रक्रिया शेण खतामध्ये कमी प्रमाणात होते म्हणून बायोस्लरीमध्ये नायट्रोजन एकाग्रता शेणखतापेक्षा जास्त असते). म्हणून बायोस्लरी फक्त शेणखता पेक्षा जास्त नत्रयुक्त आहे असे म्हणता येईल.

१३) याव्यतिरिक्त, बायोस्लरी मधील सेंद्रिय कर्बाचा उपयोग सूक्ष्मजीवांमार्फत अन्न म्हणून केल्याने मातीच्या नायट्रोजन फिक्सेशन प्रक्रियेस गती देऊ शकते जे मातीत नायट्रेटचे प्रमाण आणि नायट्रोजन पिकानी घेण्याचे प्रमाण वाढवेल.

१४) तसेच, कार्बन:नायट्रोजन प्रमाण कमी असणारी बायोस्लरी मातीमधील सेंद्रिय पदार्थांचे पटकन खनिज्यांमध्ये रूपांतर करण्यास कारणीभूत ठरेते. म्हणून जमिनीत बायोस्लरी जोडल्यामुळे सेंद्रीय पदार्थांचे नुकसान होऊ शकते. (कार्बन कमी आणि नायट्रोजन चे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याठिकाणी एनारोबिक जिवाणूंची वाढ मोठ्याप्रमाणात होते त्यामुळे नायट्रोजनचे प्रमाण वाढते. वाढलेले नायट्रोजनचे प्रमाण हे पिकांसाठी घातक असते).

१५) नायट्रोजन आणि पोटॅश ची पातळी बायोस्लरी च्या वापरामुळे सुधारली जाऊ शकते.

१६) बायोगॅसमध्ये टाकल्या जाणाऱ्या शेनापेक्षा बाहेर येणाऱ्या बायोस्लरी मध्ये नायट्रोजन हा 70% जास्त असू शकतो तर फोस्फरस हा 30% कमी असू शकतो.

Referance

Lavinia, W., and Harrie, O. (2014). Bioslurry a Supreme Fertiliser–A Study on bioslury results and uses.

https://www.ourenergypolicy.org/wp-content/uploads/2014/05/bioslurry.pdf