21/07/2025 to 22/07/225

आज आम्ही बीएसएफ Larvae वाळवण्यासाठी विशेष ट्रे तयार करण्याचे काम केले. एक दिवसात अंदाजे 10 किलो Larvae ओव्हनमध्ये वाळवता यावेत, यासाठी मोजमाप घेऊन 9 ट्रे बनवण्यात आले.

या कामासाठी मी, हर्षद, आणि महेश सर यांनी एकत्रितपणे मेहनत घेतली. प्रथम ओव्हनचा आकार आणि क्षमता पाहून प्रत्येक ट्रेसाठी आवश्यक माप निश्चित केले. त्यानंतर मापानुसार ट्रे तयार करण्यात आले. सर्व ट्रे तयार झाल्यावर ते नीट स्वच्छ करून वापरासाठी तयार ठेवण्यात आले.

हे ट्रे तयार झाल्यामुळे बीएसएफ Larvae वाळवण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत, स्वच्छ आणि कार्यक्षम होणार आहे. यामुळे वेळ वाचेल आणि उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहील.

BSF Larvae वाळवण्याचा प्रायोगिक अहवाल

प्रयोगाची पद्धत

१. Larvae निवड व वजन

  • वाळवणीसाठी २.९ किलो बीएसएफ Larvae घेतले.

२. गरम पाण्याची प्रक्रिया

  • Larvae गरम पाण्यात टाकून ट्रीटमेंट दिली.
  • यामुळे Larvae पूर्णतः निष्क्रिय (dead) झाले.

३. ट्रेमध्ये मांडणी

  • गरम पाण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Larvae ट्रेमध्ये एकसमान पसरवून ठेवले.
  • 280 ग्रॅम Larvae प्रत्येकी एका ट्रेमध्ये समान प्रमाणात पसरवले, म्हणजे सर्व Larvae एकसमान वाळतील.

४. ओव्हन सेटिंग

  • ओव्हनचे तापमान ९५°C वर सेट केले.
  • एकूण ३ तास वाळवणी प्रक्रिया चालवली.

५. अंतिम वजन मोजणी

  • वाळवण पूर्ण झाल्यावर Larvae वजन १.०८० किलो झाले.

6.निरीक्षणे

  • वजनात लक्षणीय घट झाली, यामुळे पाण्याचे प्रमाण (Moisture) मोठ्या प्रमाणात कमी झाले.
  • ९५°C तापमानावर ३ तासात योग्य वाळवणी झाली.