08/08/2025
अलीकडेच डिक्षीत सर आणि अर्चना मॅडम यांच्यासोबत चर्चा झाली. त्यामध्ये हे ठरले की आपल्या ड्रायिंग प्रकल्पासाठी रानभाज्या गोळा करून आणायच्या आहेत. ह्या निमित्ताने मला आणि प्रणितला लोनावळा, तुंगी या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली.
तुंगी गावातील स्थानिक लोक आधीच काही रानभाज्या गोळा करून ठेवलेल्या होत्या. मात्र अजूनही काही भाज्या गोळा करायच्या बाकी होत्या. त्यासाठी आम्ही थोड्या अंतरावर जंगलाच्या दिशेने गेलो.
तेथे आम्हाला विविध प्रकारच्या रानभाज्या मिळाल्या. त्यामध्ये प्रमुखतः –
miki
Kla kuda
Mashavel
चिचूरडा
चाई
Bharangi
अशा अनेक रानभाज्या आम्ही काळजीपूर्वक गोळा केल्या.
हा अनुभव विशेष का वाटला?
रानभाज्या म्हणजे निसर्गाची खरी संपत्ती. त्या केवळ चवदार नसतात तर पौष्टिकतेनेही परिपूर्ण असतात. गावातील लोकांकडून त्यांची माहिती घेणे, जंगलात जाऊन प्रत्यक्ष त्यांचा शोध घेणे हा अनुभव खूप समृद्ध करणारा होता.
सोलार डोम ड्रायरमध्ये रानभाज्यांचे वाळवणीकरण 🌞🌿
10/08/2025 TO 12/08/2025
अलीकडे आम्ही गोळा केलेल्या रानभाज्या वाळवण्यासाठी सोलार डोम ड्रायर चा वापर केला. यामध्ये आम्ही प्रामुख्याने या भाज्या ठेवल्या –
अळू
काळा कूडा पाने
काळा कूडा शेंग
माशावेल
चाई
पाथरी
आणि इतर काही रानभाज्या
या भाज्या ३ दिवस डोम ड्रायरमध्ये ठेवण्यात आल्या. त्यात विशेष म्हणजे पाथरी ही भाजी फक्त २ दिवसांत पूर्णपणे वाळली, तर इतर भाज्या ३ दिवस ठेवल्यानंतरही काही प्रमाणातच वाळल्या. त्या पूर्णपणे कोरड्या झाल्या नाहीत.

निरीक्षणातून काय समजले?
प्रत्येक भाजीची रचना आणि ओलसरपणा वेगळा असल्याने त्यांचे वाळवणीचे वेग वेगवेगळे असतात.
पाथरीसारख्या पानांच्या भाज्या लवकर वाळतात, तर अळूसारख्या जाडसर व पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्यांना जास्त वेळ लागतो.
डोम ड्रायरमध्ये २ ते ३ दिवसात भाज्यांचा मोठा भाग वाळतो, पण काही भाज्यांसाठी अधिक वेळ किंवा अतिरिक्त उष्णतेची गरज असते.

निष्कर्ष
या प्रयोगातून आम्हाला हे समजले की सोलार डोम ड्रायर रानभाज्या टिकवण्यासाठी प्रभावी साधन आहे, परंतु भाजीच्या प्रकारानुसार वाळवणीची वेळ बदलते. भविष्यात अधिक चांगले परिणाम मिळवण्यासाठी वेळ व तापमान यावर अजून बारकाईने लक्ष द्यावे लागेल.
सोलार डोम ड्रायरमध्ये भाज्या ठेवल्यानंतर काही भाज्या पूर्णपणे वाळल्या नाहीत. त्या काही प्रमाणात ओलसर राहिल्या. त्यामुळे पुढील टप्प्यात आम्ही या भाज्या इलेक्ट्रिक ड्रायरमध्ये ४५° सेल्सिअस तापमानावर ठेवून वाळवण्याचा प्रयोग केला.

परिणाम:
इलेक्ट्रिक ड्रायरमध्ये भाज्या नीट व एकसमान पद्धतीने वाळल्या.
ज्या भाज्या डोम ड्रायरमध्ये अर्धवट राहिल्या होत्या त्या पूर्णपणे कोरड्या मिळाल्या.
तापमान नियंत्रित असल्याने भाज्यांचा रंग, सुगंध आणि पोषणमूल्ये बऱ्यापैकी टिकून राहिली.
निरीक्षण
डोम ड्रायर हा नैसर्गिक ऊर्जेवर चालणारा चांगला पर्याय आहे, पण हवामान व भाजीच्या प्रकारानुसार त्याचा परिणाम बदलतो.
इलेक्ट्रिक ड्रायर हा पर्याय अधिक नियंत्रित व खात्रीशीर ठरतो. विशेषतः जेव्हा भाज्या पूर्णपणे वाळत नाहीत तेव्हा तो उपयुक्त ठरतो.