introduction:
Siphon ही कन्सेप्ट वायु दाब फरक (Air pressure difference) आणि ग्रॅव्हिटी फुल (gravity pull) या दोन गोष्टींवरून अवलंबून आहे. मग ती कशी काम करते हे आपण खालील आकृतीवरून पाहूया.
1. वरील आकृतीमध्ये दोन काचेची भांडी घेतली आहेत.एक पूर्ण भरलेला आहे आणि दुसरा रिकामा आहे या दोन्ही भांड्यांना जोडण्याचे काम वक्रनलिका म्हणजे siphon करीत आहे.
2. रिकामा म्हणजे रिक्त नळीच्या टोकाला व्हॅक्युम मशीन जोडली आहे, नळीमध्ये व्हॅक्युम तयार करण्यासाठी. व्हॅक्युम मशीन पाईप मधील सर्व हवा बाहेर ओढेल त्यामुळे पाईप मध्ये हवेची पोकळी ( Air pressure difference) निर्माण होईल.
3. अता पाण्याने भरलेतला भांड्यातील नळीच्या टोकाला असलेले प्रेशर siphon च्या टॉप लेव्हल पेक्षा जास्त होईल. त्यामुळे हवेच्या गुणधर्मानुसार ती कमी दाबाकडून जास्त दाबाकडे जाईल आणि सोबत पाणीही वरती घेऊन जाईल
4. म्हणजे ही हवेची पोकळी भरून काढण्यासाठी, A या टोकातून पाणी वरती जाईल जेव्हा हे पाणी C ठिकाणी पोचेल तेव्हा ते ग्रविटेशन फुल मुळे B या टोकातून दुसऱ्या भांड्यात गोळा होणे सुरू होईल. जोपर्यंत दोन्ही भांड्यातील पाणी समान पातळीला (equilibrium position) येत नाही तोपर्यंत हा प्रवाह चालू राहील.वर वर्णन केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून स्फिऑन ( Siphon)कार्य करते.