१] उद्दिष्टे :- २००० स्क्वेअर फूट जागा ,दहा हजार लिटर पाण्याच्या चार फिश टँक ,प्रती टँक मध्ये ४०० मासे म्हणजे एकून १६०० मासे सात महिन्यानंतर ५०० gm चे म्हणजे ८०० kg प्रोडक्शन देणारी फिश फार्मिंग सिस्टीम .

नियोजन व सिस्टीम बांधकाम पद्धत :- या सिस्टीम मध्ये दहा हजार लिटर पाण्याच्या चार फिश टँक आहेत .त्यांना जमिनी खालून सेंटर ड्रेनेज देऊन चार टाक्यांचा एक सप्लाय घेऊन तो टाकीची ठराविक लेवल झाल्यानंतर ओवर फ्लो होईल इतक्या वर ठेऊन पाणी ग्रो बेड मध्ये पाठवण्यास एक टाकी आहे .या टाकीं मधून ग्रो बेड मध्ये हे पाणी झाडांच्या मुळान्द्वारे अमोनियाचे रुपांतर नायट्रेट मध्ये होहून यावर फळभाज्या व पालेभाज्या घेता येईल व पाणी फिल्टर होईल या साठी हे ग्रो बेड दिले आहेत .हे पाणी फिल्टर होऊन दोन टँक मध्ये एकत्र करून ते पुन्हा फिश टँक मध्ये जाईल यासाठी १ hp चा पाण्याचा पंप आहे .व ब्लोईंग साठी १ hp चा ब्लोअर आहेत .या सिस्टीम मध्ये २०% म्हणजे ८०० लिटर पाणी फिल्टर करण्यासाठी पाण्याचा पंप टाइमर वर दर ३० मिनिटाला १ मिनिट मोटर सेट केली जाते .

फिश टँक मधील पाण्याचे व ग्रो बेड मधील रोपांना आवश्यक असणारे तापमान व आद्रता मेन्टेन ठेवण्यासाठी पूर्ण सिस्टीमवर पॉलिहाउस बांधणे गरजेचे असते .

या सिस्टीम मध्ये ग्रो बेड ची संख्या वाढून भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यासाठी केले आहेत .

ही सिस्टीम दहा हजार लिटर ची असून यामध्ये ४०० मासे सात महिन्यानंतर २०० kg उत्पादन मिळण्यासाठी ची आहे.अमोनिया कमी करण्यासाठी ग्रो बेड चा वापर केला आहे .

साधारण २५०० स्क्वेअर फूट मधील सिस्टीम मध्ये दहा हजार लिटर च्या २ टाक्या असून या मधून ४०० kg माश्यांचे उत्पादन घेणे व ग्रो बेड व NFT पद्धतीने भाजीपाला उत्पादन घेणे .या मध्ये विदेशी भाजीपाला म्हणजे केल ,सॅॅलरी,पालक ,ब्रोकोली ,लेट्युस यांचे प्रमुख उत्पादन घेणे व माश्यांचे अमोनियाचे पाणी भाजीपाल्याला खतांचा खर्च कमी करण्यासाठी करणे .

या सिस्टीम ची रचना दोन फिश टँक मधून माश्यांचे पाणी ग्रो बेड मधून फिल्टर होऊन एका टाकीत साठवून पाण्याच्या पंपाने सहायाने पाणी NFT हायड्रोपोनिक्स मधून फिरवून पुन्हा त्या टाकीत येइल व आलेले पाणी पुन्हा फिश टँक जाईल .असे पाणी फिरत राहील व फिश टँक मधील २०% पाणी दररोज फिल्टर होईल .साधारण अशी रचना आहे .

केज फिश फार्मिंग :-

१] केज फिश फार्मिंग :- या मध्ये मासे मोठ्या तळ्यात जाळ्यानचे पिंजरे लाऊन या मध्ये विविध माश्यांचे एकाच तळ्यात उत्पादन घेतले जाते .व या सोबत केज च्या फ्लोटिंग जागेत हायड्रोपोनिक्स पद्धतीने भाजीपाला वाढवू शकतो .

२] पिंजरा बांधण्याची पद्धत :- पिंजरा फ्रेमसाठी एचडीपीई पाईप पीई 100 किंवा जीआय पाईप (1.5%) बी / सी वर्ग प्राधान्य दिले जाते. जेव्हा जीआय पाईप वापरला जातो, तेव्हा सर्व सांधे डबल वेल्डेड असतात आणि जीआय पिंजरा फ्रेम एपोक्सी लेपित असतो आणि एअर-भरलेल्या एचडीपीई बॅरल (200 लिटर, 8-10 क्रमांक) वर फ्लोटिंग असतो. समुद्री पिंजरे शक्यतो परिपत्रक-आकाराचे असतात कारण ते आयताकृती किंवा चौरस आकारांपेक्षा समुद्राच्या परिस्थितीस अधिक चांगले प्रतिकार करू शकतात.तसेच असे पिंजरे गोड्या पाण्याच्या तळ्यात लावून कोई ,तिलापिया,या माश्यांचे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो .