पनवेल फिश फार्म

१ ]उद्दिष्ट :- दीड लाख लिटर पाणी साठा होईल असे तळे बनवून या मध्ये फिश फार्मिंग करणे व या तळ्यातील पाणी उन्हाळ्यात शेतीसाठी वापरणे .

2]सिस्टीम चे नियोजन व बांधकाम पद्धत :-

फिश टॅॅक चे नियोजन करून जमीन चे मापन केले व तळे बांधाचे ठिकाण स्वच्छ करून घेतले .

फिश टॅॅक कच्चे मापन करून ड्रॉईन करून गुगल स्केच तयार केले .साधारण २३ मीटर लांब १८ मीटर रुंद व २ मीटर खोल असे तळ्याचे मापन करून स्केच केले .

तळ्याच्या ड्रॉईन नुसार JCB द्वारे तळ्याचे खोदकाम सुरु झाले .या ठिकाणी जुन्या पडक्या विहीरीचा खड्डा असल्याने हे खोदकाम सहा तासात पूर्ण झाले .

तळ्याचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर सिमेंटच्या च्या पिशवीत माती भरून ठेवली जेणेकरून कापड कापड पसरवल्यावर त्यावर वजन ठेवता येईल.साधारण ३० *२० मीटरचा कापड ५०० मायक्रोन चा शेत तळ्याचा पेपर योग्य त्या घडी घालून पसरवला .

तळ्याच्या वरच्या बाजूस तळ्याचे पाणी फिल्टरेशन साठी MBBR सेअप चे काम सुरु केले .या

तळ्यातील २०% पाणी दरोरोज MBBR सेटअप मधून फिल्टर झाले पाहिजे म्हणून ८०० लिटर MBBR ३०% जागा व पाण्यासाठी ७० % जागा ठेवण्यासाठी १००० लिटरच्या चार टाक्यांचे प्लम्बिंग केले .या टाक्या एकमेकांना ड्रेनेज मधून टाकीच्या वरच्या बाजूस सप्लाय दिला ,जेणेकरून पाणी ओवर फ्लो दुसऱ्या टाकीत पडेल .व चौथ्या टाकीत फ्लड & ड्रेन पद्धतीचा सायफन लावला .व तीन टाक्यांमध्ये ८०० लिटर MBBR टाकले .चौथी टाकी मोकळी ठेवली म्हणजे सायफन लागल्यावर MBBR तळ्यात वाहून जाणार नाहीत .

मूव्हिंग बेड बायोफिल्म रिएक्टर ( MBBR ) ची कार्यप्रणाली :-

मूव्हिंग बेड बायोफिल्म रिएक्टर (एमबीबीआर) हे एक जैविक तंत्रज्ञान आहे जे सांडपाणी प्रक्रिया प्रक्रियेसाठी वापरली जाते नगरपालिका आणि औद्योगिक वापरासाठी उपयुक्त. आणखी एक सामान्य नाव मूव्हिंग बेड फिल्म अणुभट्टी आहे. एमबीबीआर सांडपाण्यावरील उपचारांसाठी एक आर्थिक समाधान प्रदान करते. एसटीपी एमबीबीआर तंत्रज्ञान म्हणजे सीवेज ट्रीटमेंट प्लांट्समध्ये फिरत्या बेड बायोफिल्म रिएक्टरचा वापर.

यामुळे माश्यांची विष्टा विरघळून तयार झालेला अमोनिया कमी करण्यासाठी आम्ही ही पद्धत वापली ,या एमबीबीआर वर बॅक्टेरीया वाढवून या मध्ये NH3\NH4 चे NH२ व NH ३ मध्ये रुपांतर करून या पाण्यात असणारा NH ३ म्हणजे नायट्रेट चा वापर भाजीपाला वाढवण्यासाठी खता प्रमाणे करून भाजीपाला वाढीसाठी मदत करतो .

फिश टॅक मधून पाणी MBBR टाकीत नेण्यासाठी १ HP पाण्यातली मोटार वापली व पाण्यात ऑक्सिजन देण्यासाठी १ HP चा एअर ब्लोअर वापला .

फिश टॅक मध्ये एअर स्प्रेड करण्यासाठी १ मीटर बाय १ मीटर च्या PVC फ्रेम मध्ये १ मीटरच्या ४ एअर ट्यूब लावल्या व तळ्यात पाण्याच्या १ मीटर खोलीवर सोडल्या .असे तीन स्प्रेडर तळ्यात सोडले .जेणे करून माश्यांना ऑक्सिजन चा पुरवठा चांगला होईल .

MBBR टाकीमध्ये एअर ब्लोईंग साठी थ्री वे चे एअर स्प्रेडर वापरले आहेत .जेणेकरून एमबीबीआर वर बॅक्टेरीया वाढवून या मध्ये NH3\NH4 चे NH२ व NH ३ मध्ये रुपांतर चांगल्या प्रकारे होईल .

भाजीपाला वाढवण्यासाठी व पाण्याचे फिल्टरेशन चांगल्या प्रकारे होण्यासाठी साधारण १० *५ फुटाचे दोन ग्रो बेड बनवले .शेत तळ्याचा पेपर वापरून त्यात विटांचे तुकडे टाकून दोन ग्रो बेड तयार केले .या मध्ये कोबी ,फ्लावर ,मिरची व आळू ची रोपे लावली.

अशा प्रकारे पूर्ण सिस्टीम सेट केली . फिश टॅक मधून माश्यांची विष्टा विरघळून तयार झालेला अमोनिया चे पाणी मोटरच्या सहाय्याने MBBR च्या टाकीत आणून या एमबीबीआर वर बॅक्टेरीया वाढवून या मध्ये NH3\NH4 चे NH२ व NH ३ मध्ये रुपांतर करून या पाण्यात असणारा NH ३ म्हणजे नायट्रेटमध्ये रुपांतर करून सायफन द्वारे भाजीपाल्याच्या ग्रो बेड मध्ये आणले .व ग्रो बेड मध्ये असलेल्या रोपांनी नायट्रेट वापरून फिल्टर पाणी पुन्हा तळ्यात सोडले .या पूर्ण सिस्टीम मध्ये प्रती दिवस तळ्यातील २०% पाणी फिल्टर केले जाते .व पाण्यात ऑक्सिजनचा पुरवठा ६ ते ८ PPM असल्याने माश्यांच्या वाढीसाठी चांगले असते .

तळ्यामध्ये पहिल्या बॅॅच मध्ये आम्ही १००० कटला मासा ,५०० सायफ्रनस मासा ट्रीटमेंट करून सोडला .यांना फीड म्हणून शेंगदाणा पेंड ,शेन ,गव्हाचा भुसा टाकून शेवाळ वाढवून ति माश्यांना फीडिंग केले .साधारण तीन महिने सिस्टीम चांगल्या प्रकारे चालू होती .काही अडचणी स्तव नंतर माश्यांना फीडिंग करणे बंद केले .त्यामुळे साधारण 9 महिन्यानंतर मासे काढले .

कटला माश्याला फीडिंग न केल्यामुळे तो लहानच राहिला .व सायफ्रनस माश्याला शेवाळ खायला मिळाल्याने तो ५०० gm चे ५० मासे मिळाले .व ग्रो बेड मध्ये मिरची ,आळू चे उत्पादन चांगले मिळू शकते हे अभ्यासले ,पुन्हा ही सिस्टीम ,चालू करून नवीन माश्यांची बॅॅच लावण्याचे नियोजन चालू आहे .