.

.

Introduction

इनपुट डिव्हाइस (Input Device) आणि सेन्सर (Sensor) यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. ही उपकरणे बाहेरील वातावरणातील माहिती ओळखून ती संगणक, Arduino किंवा ESP32 सारख्या मायक्रोकंट्रोलरला पाठवतात.

Example , LDR सेन्सर प्रकाश ओळखतो, तापमान सेन्सर तापमान मोजतो, PIR सेन्सर हालचाल ओळखतो, तर फ्लोट सेन्सर पाण्याची पातळी ओळखतो. या माहितीच्या आधारावर उपकरणे आपोआप (Automatic) काम करू शकतात.

आज स्मार्ट होम, शेती, उद्योग, सुरक्षा प्रणाली आणि IoT प्रकल्पांमध्ये सेन्सरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

इनपुट डिव्हाइस (Input Device) म्हणजे असे Device जे User कडून किंवा बाहेरील वातावरणातून माहिती (Input) घेऊन ती Computer, Arduino, ESP32 किंवा इतर Microcontroller ला पाठवते. या माहितीच्या आधारावर System पुढील काम करते.

Sensor हे एक Electronic Device आहे जे वातावरणातील बदल ओळखते आणि त्याचे Electrical Signal मध्ये रूपांतर करते. हे Signal Arduino, ESP32 किंवा Computer ला पाठवले जातात.

उदाहरणार्थ, प्रकाश (Light), तापमान (Temperature), हालचाल (Motion), अंतर (Distance), आर्द्रता (Humidity) आणि पाण्याची पातळी (Water Level) मोजण्यासाठी वेगवेगळे Sensors वापरले जातात.

Sensor ची कार्यपद्धती खूप सोपी आहे.

  1. Sensor वातावरणातील बदल ओळखतो.
  2. त्या बदलाचे Electrical Signal मध्ये रूपांतर करतो.
  3. हा Signal Arduino, ESP32 किंवा इतर Microcontroller ला पाठवतो.
  4. Microcontroller त्या माहितीवर प्रक्रिया करून आवश्यक काम करतो. उदाहरणार्थ, LED चालू करणे, Motor सुरू करणे किंवा Buzzer वाजवणे.
SensorUSE
LDR Sensorप्रकाश (Light) ओळखण्यासाठी
Temperature Sensorतापमान मोजण्यासाठी
Humidity Sensorहवेतील आर्द्रता मोजण्यासाठी
Ultrasonic Sensorअंतर (Distance) मोजण्यासाठी
PIR Sensorहालचाल (Motion) ओळखण्यासाठी
Float Sensorपाण्याची पातळी (Water Level) मोजण्यासाठी
Soil Moisture Sensorमातीतील ओलावा मोजण्यासाठी
sound Sensor आवाज ओळखण्यासाठी किंवा (Sound Level) मोजण्यासाठी.

आज Sensor चा वापर अनेक ठिकाणी केला जातो.

  • Automatic Light System
  • Water Tank Level Monitoring
  • Smart Farming
  • Security System
  • Parking Sensor
  • Weather Monitoring
  • Industrial Automation
  • IoT Projects

Arduino आणि ESP32 हे Microcontroller Boards आहेत. त्यांच्यासोबत वेगवेगळे Sensors जोडून अनेक Projects तयार करता येतात.

उदाहरणे:

  • LDR Sensor + Arduino → अंधार झाल्यावर LED आपोआप ON होते.
  • PIR Sensor + ESP32 → हालचाल झाली की Buzzer ON होतो.
  • Float Sensor + Arduino → Water Tank भरल्यावर सूचना मिळते.
  • Ultrasonic Sensor + ESP32 → वस्तूचे Distance मोजता येते.

Sensor चे Output Pin, Arduino किंवा ESP32 च्या Input Pin ला जोडले जाते. त्यानंतर Program च्या मदतीने Sensor कडून आलेल्या माहितीवर प्रक्रिया करून आवश्यक काम केले जाते.

  • अचूक माहिती मिळते.
  • वेळ आणि मेहनत वाचते.
  • Automatic System तयार करता येते.
  • सुरक्षितता वाढते.
  • वीजेची बचत होते.
  • मानवी चुका कमी होतात.
  • Smart Projects तयार करणे सोपे होते.

या आठवड्यात माझे वैयक्तिक काम मायक्रोकंट्रोलर बोर्डशी सर्व सेन्सर जोडणे आणि त्यांचे आउटपुट तपासणे हे होते. मी प्रत्येक सेन्सरची चाचणी केली आणि सेन्सरची मूल्ये वाचून ते कार्य करत असल्याची पडताळणी केली.Microcontroller Board सोबत जोडले आणि प्रत्येक सेन्सरची स्वतंत्रपणे चाचणी केली. त्यानंतर Serial Monitor मध्ये सेन्सरची मूल्ये (Sensor Values) पाहून त्यांचे Output योग्य प्रकारे मिळत आहे का, याची पडताळणी केली.

Float Sensorपाण्याची पातळी Water Level मोजण्यासाठी

2 . Float Sensor

Float Sensor हा पाण्याची पातळी (Water Level) ओळखण्यासाठी वापरला जाणारा एक साधा Sensor आहे. हा Sensor पाण्याची पातळी वाढली किंवा कमी झाली आहे का, हे ओळखतो आणि ON/OFF Signal देतो. त्यामुळे Water Tank मधील पाण्याची पातळी सहज तपासता येते.

ParameterInformation
Sensor NameFloat Sensor (Float Switch)
OutputDigital (ON/OFF)
Operating Voltage3V – 24V DC
Contact TypeNormally Open (NO) / Normally Closed (NC)
Body MaterialPlastic
Operating Temperature-10°C ते +85°C
Wire Lengthसाधारण 30 cm (Model नुसार बदलू शकते)
  1. Float Sensor Water Tank मध्ये बसवला जातो.
  2. पाण्याची पातळी वाढली की Float वर येतो.
  3. Float मधील Magnet, Reed Switch जवळ येतो.
  4. त्यामुळे Reed Switch ON किंवा OFF होतो.
  5. त्यानंतर Sensor Arduino किंवा ESP32 ला Signal पाठवतो.
  6. Program नुसार LED, Buzzer किंवा Motor ON/OFF होते.

Float Sensor Testing and Working
या आठवड्यात मी Float Sensor ची Serial Monitor वापरून टेस्टिंग केली. त्यासाठी प्रथम Arduino Uno, Float Switch, Breadboard आणि Buzzer यांचे योग्य कनेक्शन केले. त्यानंतर Arduino IDE मधील Serial Monitor द्वारे सेन्सरचे आउटपुट तपासले.

टेस्टिंगदरम्यान सुरुवातीला Float Sensor अपेक्षेप्रमाणे कार्य करत नव्हता. problem शोधण्यासाठी वायरिंग आणि कोड तपासला. त्यानंतर कोडमध्ये आवश्यक बदल करून सेन्सरची लॉजिक सुधारली. यामध्ये HIGH आणि LOW सिग्नलची स्थिती बदलण्यात आली (HIGH ऐवजी LOW आणि LOW ऐवजी HIGH). हा बदल केल्यानंतर Float Sensor योग्य प्रकारे कार्य करू लागला.

शेवटी Serial Monitor वर सेन्सरची स्थिती (HIGH/LOW) योग्यरित्या दिसू लागली आणि Buzzer देखील Float Sensor च्या स्थितीनुसार व्यवस्थित कार्य करू लागला. या प्रयोगातून सेन्सरचे कार्य, कोडमधील लॉजिक आणि Arduino सोबत सेन्सर इंटरफेस करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

// Float Sensor Testing Code

const int floatPin = 2;   // Float Sensor Signal Pin

void setup() {
  pinMode(floatPin, INPUT_PULLUP);   // Internal Pull-up Resistor
  Serial.begin(9600);

  Serial.println("Float Sensor Testing");
}

void loop() {
  int sensorState = digitalRead(floatPin);

  if (sensorState == LOW) {
    Serial.println("Water Level HIGH");
  } else {
    Serial.println("Water Level LOW");
  }

  delay(500);
}
  • Water Tank मधील पाण्याची पातळी तपासण्यासाठी.
  • Water Level Alarm बनवण्यासाठी.
  • Automatic Water Tank Controller मध्ये.
  • Water Pump किंवा Motor ON/OFF करण्यासाठी.
  • Industrial Water Tank मध्ये.
  • Aquarium आणि इतर Water Storage Tank मध्ये.
  • वापरण्यास सोपा.
  • कमी खर्चाचा.
  • अचूक ON/OFF Signal देतो.
  • कमी देखभाल (Low Maintenance).
  • Arduino आणि ESP32 सोबत सहज वापरता येतो.

Ultrasonic Sensor HC-SR04

Ultrasonic Sensor हा वस्तूचे Distance (अंतर) मोजण्यासाठी वापरला जाणारा Sensor आहे. हा Sensor Ultrasonic Sound Waves पाठवतो आणि त्या Waves वस्तूवर आदळून परत येण्यासाठी लागणारा वेळ मोजतो. त्या वेळेच्या आधारावर वस्तूचे अंतर (Distance) मोजले जाते.

ParameterInformation
Sensor NameHC-SR04 Ultrasonic Sensor
Operating Voltage5V DC
Operating Current15 mA
Measuring Distance2 cm – 400 cm
Measuring Angle15°
OutputDigital Signal
PinsVCC, Trig, Echo, GND
Frequency40 kHz
  1. Ultrasonic Sensor मधील Trig Pin द्वारे Sound Wave पाठवली जाते.
  2. ही Wave समोरील वस्तूवर आदळून परत येते.
  3. परत आलेली Wave Echo Pin द्वारे Sensor ला मिळते.
  4. Wave जाऊन परत येण्यासाठी लागलेला वेळ Sensor मोजतो.
  5. त्या वेळेच्या आधारावर Distance मोजले जाते.
  6. ही माहिती Arduino किंवा ESP32 ला पाठवली जाते.
// ESP32 + HC-SR04 Ultrasonic Sensor

#define TRIG_PIN 5
#define ECHO_PIN 18

void setup() {
  Serial.begin(115200);

  pinMode(TRIG_PIN, OUTPUT);
  pinMode(ECHO_PIN, INPUT);

  Serial.println("Ultrasonic Sensor Testing");
}

void loop() {
  long duration;
  float distance;

  // Clear Trig Pin
  digitalWrite(TRIG_PIN, LOW);
  delayMicroseconds(2);

  // Send 10µs Pulse
  digitalWrite(TRIG_PIN, HIGH);
  delayMicroseconds(10);
  digitalWrite(TRIG_PIN, LOW);

  // Read Echo Time
  duration = pulseIn(ECHO_PIN, HIGH);

  // Calculate Distance
  distance = duration * 0.0343 / 2;

  Serial.print("Distance: ");
  Serial.print(distance);
  Serial.println(" cm");

  delay(500);
}
  • वस्तूचे Distance मोजण्यासाठी.
  • Water Tank मधील पाण्याची पातळी मोजण्यासाठी.
  • Robot मध्ये Obstacle Detection साठी.
  • Automatic Parking System मध्ये.
  • Smart Dustbin Project मध्ये.
  • Industrial Automation मध्ये.
  • Robotics
  • Water Level Monitoring
  • Smart Parking System
  • Security System
  • Automatic Door System
  • Distance Measuring Projects
  • IoT Projects
  • संपर्क न करता (Non-Contact) Distance मोजतो.
  • वापरण्यास सोपा.
  • अचूक मोजमाप देतो.
  • कमी खर्चाचा.
  • Arduino आणि ESP32 सोबत सहज वापरता येतो.
  • कमी Power वापरतो.

PIR Sensor म्हणजे काय?

PIR (Passive Infrared) Sensor हा Motion Detection Sensor आहे. हा Sensor माणूस किंवा प्राण्याच्या शरीरातून निघणाऱ्या Infrared (IR) उष्णतेतील बदल ओळखतो. हालचाल आढळल्यास Sensor Digital HIGH Signal देतो आणि हालचाल नसल्यास LOW Signal देतो.

PIR (Passive Infrared) Sensor ची ESP32-C3 सोबत Testing केली. या प्रयोगामध्ये PIR Sensor वापरून Motion Detection तपासले आणि त्याचा Output Serial Monitor वर पाहिला. व्यक्ती किंवा वस्तूची हालचाल झाल्यावर Sensor ने ती ओळखून Serial Monitor वर संदेश दाखवला.ESP32-C3 आणि PIR Sensor Connection

PIR SensorESP32-C3
VCC5V
GNDGND
OUTGPIO 3

या मध्ये बझर वापरला त्याच code त्यानुसार आहे .

const int pirPin = 2;
const int ledPin = 3;

int lastState = LOW;

void setup() {
  Serial.begin(115200);
  pinMode(pirPin, INPUT);
  pinMode(ledPin, OUTPUT);

  digitalWrite(ledPin, LOW);
  Serial.println("Waiting for PIR to stabilize...");
  delay(30000);   // Wait 30 seconds
}

void loop() {
  int motion = digitalRead(pirPin);

  if (motion != lastState) {
    lastState = motion;

    if (motion == HIGH) {
      digitalWrite(ledPin, HIGH);
      Serial.println("Motion Detected!");
    } else {
      digitalWrite(ledPin, LOW);
      Serial.println("No Motion");
    }
  }

  delay(100);
}

Working Process

  1. PIR Sensor ला ESP32-C3 सोबत VCC, GND आणि OUT Pin द्वारे जोडले.
  2. Arduino IDE मध्ये Program Upload केला.
  3. ESP32-C3 संगणकाशी USB द्वारे जोडला.
  4. Serial Monitor 115200 Baud Rate वर उघडला.
  5. Sensor सुरू झाल्यानंतर सुमारे 30 ते 60 सेकंद Warm-up Time दिला.
  6. Sensor समोर हात किंवा व्यक्ती हलवली.
  7. PIR Sensor ने हालचाल ओळखून OUT Pin वर HIGH Signal दिला.
  8. ESP32-C3 ने हा Signal वाचून Serial Monitor वर “Motion Detected!” असा संदेश दाखवला.
  9. हालचाल नसताना Sensor ने LOW Signal दिला आणि Serial Monitor वर “No Motion” असा संदेश दिसला.

Flow

Power ON
      ↓
PIR Sensor Start
      ↓
Warm-up (30–60 sec)
      ↓
Read PIR Output
      ↓
Motion Detected?
   ↓             ↓
 Yes            No
 ↓               ↓
Motion         No Motion
Detected
      ↓
Repeat

PIR Sensor Data Sheet

घटकमाहिती
Sensor TypePassive Infrared (PIR)
Operating Voltage5V
OutputDigital HIGH / LOW
Detection Distance3 ते 7 मीटर
Detection Angle110° ते 120°
Warm-up Time30–60 सेकंद
Delay TimeAdjustable

PIR Sensor चे उपयोग

  • Home Security System
  • Motion Detection
  • Automatic Light Control
  • Smart Home Automation
  • Intruder Alarm System
  • Energy Saving System

DHT11 हा कमी किमतीचा सेन्सर असून तोशैक्षणिक प्रयोग आणि साध्या ऑटोमेशन प्रकल्पांमध्ये केला जातो.

DHT22 हा DHT11 पेक्षा अधिक अचूक आणि कार्यक्षम सेन्सर आहे. हा मोठ्या व व्यावसायिक प्रकल्पांमध्ये वापरला जातो. DHT22 मध्ये तापमान आणि आर्द्रतेची मोजणी अधिक अचूक मिळते. Arduino मध्ये प्रोग्राम अपलोड केल्यानंतर त्याचे रीडिंग Serial Monitor वर पाहता येते.

Arduino कनेक्शन
VCC → 5V

GND → GND

DATA → Arduino च्या Digital Pin (उदा. D2)

आवश्यक असल्यास 10kΩ Pull-up Resistor VCC आणि DATA Pin दरम्यान जोडावा.

DHT11 आणि DHT22 हे Temperature आणि Humidity Sensor आहेत.

DHT11 हा सामान्य (Basic) प्रोजेक्टमध्ये वापरता येतो.

DHT22 हा मोठ्या (Advanced) प्रोजेक्टसाठी वापरता येतो.

या दोन्ही सेन्सरचे रीडिंग Serial Monitor मध्ये तपासता येते.

Arduino सोबत Pin Diagram वापरून Connection केले जात

#include <DHT.h>

#define DHTPIN 4       // DHT11 DATA pin connected to GPIO4
#define DHTTYPE DHT11

DHT dht(DHTPIN, DHTTYPE);

void setup() {
  Serial.begin(115200);
  dht.begin();

  Serial.println("DHT11 Sensor Test");
}

void loop() {
  float humidity = dht.readHumidity();
  float temperature = dht.readTemperature();

  // Check if reading failed
  if (isnan(humidity) || isnan(temperature)) {
    Serial.println("Failed to read from DHT11 sensor!");
    delay(2000);
    return;
  }

  Serial.print("Temperature: ");
  Serial.print(temperature);
  Serial.print(" °C");

  Serial.print("    Humidity: ");
  Serial.print(humidity);
  Serial.println(" %");

  delay(2000);
}

ESP32-C3 Development Board सोबत Sound Sensor चे कनेक्शन केले. त्यानंतर ESP32-C3 मध्ये प्रोग्राम Upload करून Serial Monitor सुरू केला आणि Baud Rate 115200 निवडला.

Sound Sensor जवळ टाळी वाजवल्यावर किंवा मोठ्या आवाजात बोलल्यावर Serial Monitor मध्ये सेन्सरचा डेटा दिसू लागला. आवाज नसताना 0 (LOW) दिसत होता, तर आवाज आल्यावर 1 (HIGH) दिसत होता. यावरून ESP32-C3 ला Sound Sensor कडून योग्य सिग्नल मिळत असल्याची समजल .

त्यानंतर मी Buzzer चे कनेक्शन ESP32-C3 सोबत केले. Sound Sensor ने आवाज ओळखल्यावर ESP32-C3 ने सेन्सरकडून आलेला सिग्नल वाचला आणि Buzzer चालू झाला. आवाज थांबल्यानंतर Buzzer बंद झाला. यावरून संपूर्ण प्रोजेक्ट योग्य प्रकारे कार्य करत असल्याचे स्पष्ट झाले.

Serial Monitor चा वापर केल्यामुळे Sound Sensor कडून मिळणारा डेटा तपासणे सोपे झाले. तसेच, सेन्सर, ESP32-C3 आणि Buzzer यांच्यामधील कनेक्शन व प्रोग्राम योग्यरित्या कार्य करत आहेत की नाही, हे पडताळण्यासाठी Serial Monitor खूप उपयुक्त ठरला.

Sound Sensor हा वातावरणातील आवाज ओळखणारा सेन्सर आहे. टाळी, मोठ्याने बोलणे किंवा इतर आवाज झाल्यास हा सेन्सर त्याची माहिती ESP32-C3 ला पाठवतो.

ParameterValue
Sensor TypeElectret Microphone + LM393 Comparator
Operating Voltage3.3V – 5V DC
Current ConsumptionAbout 4–8 mA
Output TypeAnalog (AO) and Digital (DO)
Detection MethodSound Intensity
Comparator ICLM393
Adjustable SensitivityYes (Potentiometer)
Operating Temperature-20°C to +70°C
DimensionsApproximately 32 × 17 mm
  1. Microphone वातावरणातील Sound Waves ओळखतो.
  2. Sound Waves चे Electrical Signal मध्ये रूपांतर होते.
  3. हा Signal LM393 Comparator IC कडे जातो.
  4. Potentiometer च्या मदतीने Sensitivity सेट केली जाते.
  5. आवाज Threshold Level पेक्षा जास्त असल्यास Digital Output (DO) HIGH/LOW मिळतो.
  6. Analog Output (AO) मधून आवाजाच्या तीव्रतेनुसार बदलणारा Voltage Signal मिळतो.
  7. Arduino किंवा ESP32-C3 हा Output वाचून LED, Buzzer, Relay इत्यादी नियंत्रित करू शकतो.

Sound Sensor Working Flow

Sound
   ↓
Microphone
   ↓
Electrical Signal
   ↓
LM393 Comparator
   ↓
Sensitivity Check (Potentiometer)
   ↓
AO (Analog Output) / DO (Digital Output)
   ↓
ESP32-C3 / Arduino
   ↓
LED / Buzzer / Relay / Other Output

Sound Sensor use

  1. Clap Switch – टाळी वाजवल्यावर LED ON/OFF करण्यासाठी.
  2. Security Alarm – मोठा आवाज आल्यास Alarm सुरू करण्यासाठी.
  3. Noise Detection – आवाजाची पातळी ओळखण्यासाठी.
  4. Home Automation – आवाजाने Devices नियंत्रित करण्यासाठी.
  5. Smart Light – आवाज आल्यावर Light ON करण्यासाठी.
  6. Arduino / ESP32 Projects – Electronics आणि IoT Projects मध्ये वापर.
  7. School & College Projects – शिकण्यासाठी आणि Practical करण्यासाठी.
  8. Sound Monitoring – घर, ऑफिस किंवा Factory मधील आवाजावर लक्ष ठेवण्यासाठी.

हा सेन्सर LPG, Propane, Methane, Butane, Smoke आणि इतर ज्वलनशील वायू (Flammable Gases) ओळखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

MQ-2 Gas SensorESP32-C3
VCC5V
GNDGND
DOGPIO3

स लीक झाला किंवा धूर निर्माण झाला तर Gas Sensor तो ओळखतो आणि Arduino, ESP32 किंवा इतर Microcontroller ला सिग्नल पाठवतो. त्यानंतर Buzzer, LED किंवा Alarm सुरू करता येतो.

Working Process

  1. MQ-2 Sensor वातावरणातील गॅस सतत तपासतो.
  2. गॅसची पातळी ठराविक मर्यादेपेक्षा वाढली की DO पिनची स्थिती बदलते.
  3. ESP32-C3 हा सिग्नल वाचतो.
  4. Serial Monitor वर “Gas Detected” किंवा “No Gas” असा संदेश दिसतो.
  5. इच्छेनुसार LED किंवा Buzzer चालू करता येतो.
#define GAS_PIN 3   // MQ-2 DO pin connected to GPIO3

void setup() {
  Serial.begin(115200);
  pinMode(GAS_PIN, INPUT);
  Serial.println("MQ-2 Gas Sensor Test");
}

void loop() {
  int gas = digitalRead(GAS_PIN);

  if (gas == LOW) {
    Serial.println("⚠ Gas Detected!");
  } else {
    Serial.println("No Gas");
  }

  delay(500);
}

MQ-2 Gas Sensor Use

  1. LPG गॅस गळती ओळखणे – घरातील किंवा हॉटेलमधील LPG गॅस लीक शोधण्यासाठी.
  2. Smoke Detection – धूर ओळखून आग लागण्याचा धोका कमी करण्यासाठी.
  3. Home Safety System – घरामध्ये गॅस गळती झाल्यास Alarm किंवा Buzzer चालू करण्यासाठी.
  4. Industrial Safety – कारखान्यांमध्ये ज्वलनशील गॅसचे निरीक्षण करण्यासाठी.
  5. Air Quality Monitoring – हवेतील धूर आणि प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी.
  6. IoT Projects – ESP32, ESP32-C3 आणि Arduino सोबत Gas Monitoring System तयार करण्यासाठी.
  7. Gas Leak Alarm System – गॅस आढळल्यास LED, Buzzer किंवा Notification देण्यासाठी.
  8. Laboratory Safety – प्रयोगशाळेत गॅसची उपस्थिती ओळखण्यासाठी.
  9. CNG/LPG वाहनांची सुरक्षा – वाहनांमधील गॅस गळती तपासण्यासाठी.
  10. Smart Home Automation – Smart Home सुरक्षा प्रणालीमध्ये गॅस सेन्सर म्हणून वापरण्यासाठी.
ParameterValue
Sensor NameMQ-2 Gas Sensor
Operating Voltage5V DC
OutputAnalog (AO), Digital (DO)
Detection GasesLPG, Smoke, Methane, Hydrogen
Detection Range300 – 10000 ppm
Operating Temperature-20°C to +50°C
Humidity5% – 95% RH
Preheat Time20–30 Seconds
Current ConsumptionApprox. 150 mA

task this week Oscilloscope वापरून Analog आणि Digital Signal चे निरीक्षण केले. तसेच Multimeter वापरून IR Sensor चे Voltage आणि Current मोजले. याशिवाय DHT11 आणि DHT22 Sensor यांची Features आणि Performance यांची तुलना केली.

आज आम्ही IR (Infrared) Sensor चे परीक्षण (Testing) केले. IR Sensor ला ESP32 बोर्ड सोबत जोडून आवश्यक कोड अपलोड केला. त्यानंतर Serial Monitor च्या मदतीने सेन्सरचे आउटपुट तपासले. सेन्सरसमोर वस्तू आणल्यावर व दूर केल्यावर Serial Monitor वर आउटपुटमध्ये बदल दिसून आला. या प्रयोगातून IR Sensor योग्य प्रकारे कार्य करत असल्याची खात्री झाली आणि ESP32 सोबत त्याचे यशस्वी परीक्षण करण्यात आले.

ESP32 Dev ModuleArduino UNO
GPIO17 (TX2)D2 (RX – SoftwareSerial)
GPIO16 (RX2)D3 (TX – SoftwareSerial)
GNDGND
#include <SoftwareSerial.h>

SoftwareSerial espSerial(2, 3); // RX, TX

void setup() {
  Serial.begin(9600);
  espSerial.begin(9600);

  Serial.println("Arduino UNO Ready");
}

void loop() {
  espSerial.println("Hello from Arduino");

  if (espSerial.available()) {
    String data = espSerial.readStringUntil('\n');
    Serial.print("Received: ");
    Serial.println(data);
  }

  delay(1000);
}

working process

IR LED सतत Infrared किरणे बाहेर सोडते.

जर समोर कोणतीही वस्तू नसेल, तर किरणे परत येत नाहीत.

जर समोर वस्तू असेल, तर IR किरणे त्या वस्तूवर आदळून परत परावर्तित होतात.

IR Receiver त्या परावर्तित किरणांना ओळखतो.

Comparator IC (LM393) सिग्नल प्रक्रिया करून HIGH किंवा LOW डिजिटल आउटपुट देते.

ParameterValue
Operating Voltage3.3V – 5V DC
Operating Current15–20 mA
Detection Distance2 cm – 30 cm (Adjustable)
Output TypeDigital (HIGH/LOW)
Output PinOUT
Operating Temperature-10°C to +50°C
Detection AngleApproximately 35°
Response TimeLess than 2 ms
Comparator ICLM393
IR Wavelength940 nm

ऑसिलोस्कोप हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. याचा उपयोग Analog आणि Digital सिग्नल स्क्रीनवर पाहण्यासाठी व मोजण्यासाठी केला जातो.

  1. सर्किटमधील सिग्नल Probe द्वारे ऑसिलोस्कोपला जोडला जातो.
  2. ऑसिलोस्कोप त्या सिग्नलचे Voltage (Y-अक्ष) आणि Time (X-अक्ष) नुसार ग्राफ दाखवतो.
  3. त्यामुळे सिग्नलचा आकार (Waveform), वेळ (Time), वारंवारिता (Frequency) आणि व्होल्टेज (Voltage) सहज समजते.
  4. सिग्नलमध्ये काही दोष किंवा बदल असल्यास ते देखील स्क्रीनवर दिसतात.
  • Analog सिग्नल सतत बदलत असतो.
  • त्याची वेव्ह Smooth Wave दिसते.
  • उदाहरण: मायक्रोफोन, तापमान सेन्सर, ऑडिओ सिग्नल.
  • Digital सिग्नलमध्ये फक्त 0 (LOW) आणि 1 (HIGH) अशी दोनच पातळी असतात.
  • त्याची वेव्ह चौकोनी (Square Wave) दिसते.
  • उदाहरण: Arduino, ESP32, IR Sensor, DHT11.
  • Analog आणि Digital सिग्नल पाहणे.
  • Voltage, Frequency आणि Time मोजणे.
  • सर्किटमधील Fault शोधणे.
  • सेन्सर आणि मायक्रोकंट्रोलरचे Output तपासणे.

ऑसिलोस्कोपच्या मदतीने Analog आणि Digital सिग्नल स्क्रीनवर स्पष्टपणे पाहता येतात. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक सर्किटची चाचणी (Testing) आणि त्शोधणे (Troubleshooting) सोपे होते.