18/07/2025
गाजर हलवा हा एक पारंपरिक व लोकप्रिय गोड पदार्थ असून त्याचा इंस्टंट प्रीमिक्स तयार करण्याच्या प्रक्रियेत आम्ही विविध तांत्रिक बाबींचा अभ्यास करत आहोत. याच उपक्रमात आम्ही हीट पंप ड्रायर वापरून गाजर वाळवण्याचा एक महत्त्वाचा ट्रायल घेतला.
ठिकाण आणि सुरुवात
हीट पंप ड्रायर उपलब्ध असल्यामुळे आम्ही धामारी गावातील श्री. आनंद मोहिते यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या कडे असलेल्या ड्रायरमुळे ट्रायल घेणे सुलभ झाले
गाजर खरेदी आणि शिजवण्याची प्रक्रिया
- चाकण मार्केट मधून आम्ही 40 किलो गाजर ₹35 प्रति किलोने खरेदी केली.
- गाजर शिजवण्यासाठी 20 किलो गाजराच्या प्रत्येकी 2 बॅचेस बनवण्यात आल्या.
- प्रत्येक बॅच शिजवण्यासाठी 1 तास, म्हणजे एकूण 2 तास लागले.
- शिजवलेल्या गाजराचे वजन झाले: 38,700 ग्रॅम.

ग्रेडिंग आणि ट्रेवर पसरवणे
- शिजवलेले गाजर आम्ही क्रेट्स मध्ये भरून धामारी येथे नेले.
- तेथे स्लायसर मशीनचा वापर करून ग्रेडिंग करण्यात आले.
- ग्रेडिंगनंतरचे एकूण वजन: 36,340 ग्रॅम

ट्रेचे गणित:
- ट्रेचा आकार: 4.5 स्क्वेअर फूट
- प्रत्येक 1 स्क्वेअर फूटला 351 ग्रॅम गाजर पसरते.
- त्यामुळे एका ट्रेमध्ये: 1,580 ग्रॅम गाजर
- अशा पद्धतीने सर्व गाजर ट्रेमध्ये नीट पसरवून ठेवले.


हीट पंप ड्रायरमध्ये वाळवणे
- वाळवण्याची प्रक्रिया सायंकाळी 5 वाजता सुरू झाली.
- ड्रायरचे तापमान ठेवले होते: 55°C
- एकूण वाळवण्यासाठी लागलेला वेळ: 15 तास

ऊर्जेचा वापर आणि खर्च
- एकूण वीज वापर: 37.5 युनिट
- प्रति युनिट खर्च: ₹14
- एकूण वीज खर्च: ₹525
पाणी वाष्पीभवन आणि अंतिम वजन
- वाळवण्याच्या प्रक्रियेतून बाहेर पडलेले पाणी: 30.99 लिटर
- म्हणजेच 1 लिटर पाणी बाहेर काढण्यासाठी खर्च: ₹16.94
- ड्रायरचा दर तासाचा विजेचा वापर: 2.5 युनिट
- 15 तासात वाळवलेले गाजर: 5,350 ग्रॅम
- याचा अर्थ दर तासाला 2.066 किलो पाणी बाहेर पडले.
निष्कर्ष
हीट पंप ड्रायरचा वापर करून गाजर हलव्यासाठी लागणारे गाजर प्रभावीपणे व सुरक्षित रीतीने वाळवता आले.
- कमी तापमानामुळे (55°C) गाजराचे रंग आणि चव टिकवता आली.