आपल्या बोअरवेलजवळ ५ X५ आणि ७ फुट खोलीचा आधुनिक शोषखड्डा सांगितल्याप्रमाणे शोषखड्डा तयार करून घ्यावा.छतावरील पाणी पाईपद्वारे या शोष खड्यात सोडून द्यावे. छतावरील पाईपच्या तोंडाला जाळी बसवून घ्यावी .जेणेकरून कचरा पाईपमधून आत जावून जाम होणार नाही . पाऊस पडल्यानंतर छताची साफसफाई करून घ्यावी.घरासाठी ५ x ५, खोली ७ फुट खड्डा (जागा असेल तर ६ x ६ ,खोली जरा जास्त ८-१० फुट घेतली तरी जास्त पाणी मुरवण्याची क्षमता निर्माण केली जावू शकते.) घेवून त्यात वरच्या बाजूला छिद्रे पाडलेली दीड ते तीन फुट व्यासाची सिमेंटची टाकी अथवा रांजन मध्यभागी ठेवावी. जर माती ,बारीक काही कचरा जरी पाण्यातून आला तर तो या टाकीत जमा होईल. जो आपण दोन-तीन वर्षातून एकदा साफ करून घेवू शकतो.बाजूने मोठे दगडगोटे, खडी,कोळसा ,वाळूचा थर दिला जातो. याद्वारे पाणी गाळले जाईल.छतावरून पाईप खाली घेवून त्याचे तोंड या सिमेंटच्या टाकीत सोडावे आणि टाकीवर झाकण अथवा फारशी ठेवून बाजूने दगडगोटे, रेती टाकून लेवल करून घ्यावी. यावर प्लास्टिकचे अच्छादन टाकून वर फरशी ठेवून द्याव्यात जेणेकरून आत माती जाणार नाही.बाजूने दोन ते तीन वीट थराचा कठडा करून घेतला तर बाहेरील दुषित पाणी आतमध्ये जाणार नाही आणि केवळ छतावरचेल स्वच्छ पावसाचे पाणी पिटमध्ये जाईल.
अशापद्धतीने केलेल्या शोषखड्यातून पाणी गाळून जमिनीत मुरले जाईल.हि बोअरवेलमध्ये पावसाचे पाणी सोडण्याची सुरक्षित पद्धती आहे.
बोर पुनर्भरण केल्याने पावसाचे वाहून जाणारे पाणी हे जमिनीत मुरवले जावून आपले बोर रिचार्ज होण्यास मदत होते.पाण्याची पातळी वाढते. ज्यांनी बोर पुनर्भरण करून घेतले आहे त्यांना या दुष्काळात बराच फायदा झाला आहे.
आपणाकडे बोर नसले तरी छतावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी याच पद्धतीने जमिनीत मुरवून जलपुनर्भरण करू शकता.
पाण्याचा प्रत्येक थेंब मुरवणे हि काळाची गरज आहे. हि आपली जबाबदारी आहे. यासाठी सरकार वर विसंबून न राहता प्रत्येकाने हे आपले कर्तव्य समजले पाहिजे. आपले घरातील कोणतेही कार्य करताना आपण सरकारची वाट पाहतो का ? मग हे पण आपले कार्य समजून प्रत्येकाने जलसाक्षर झालेच पाहिजे.
पाण्याचा वापर जपून करा. पाण्याचा अपव्यय टाळा.
जलसाक्षर व्हा ! जलसाक्षर करा !!पाणी अडवा ! पाणी जिरवा !! ….
Science – Environment – How to recharge underground water – English