नर्सरी व्यवस्थापनातील समस्या :
- अंकुरण टक्केवारी कमी होणे
- बियाण्याची गुणवत्ता, चुकीचे पाणी व्यवस्थापन व तापमानामुळे.
- बुरशीजन्य रोग वाढणे
- जास्त आर्द्रता, प्रदूषित कोकोपीट, स्वच्छतेचा अभाव.
- माती/कोकोपीटचा चुकीचा pH व EC स्तर
- रोपे पिवळी पडणे, वाढ खुंटणे.
- पाणी देण्यात असलेली अनियमितता – जास्त किंवा कमी पाणी → रोपे मरतात.
- योग्य हार्डनिंग न केल्याने रोपे प्रत्यारोपणानंतर मरतात– अचानक सूर्यप्रकाश/पाणी बदल सहन होत नाही.
- कीड व रोग नियंत्रणातील त्रुटी – शूट फ्लाय, थ्रिप्स, aphids → रोपांची गुणवत्ता कमी.
- न्युट्रिएंट (खते) योग्य प्रमाणात न देणे
- रोपे कमकुवत, पातळ किंवा उंच वाढलेली.
उद्दिष्टे :
- उच्च दर्जाची, निरोगी व मजबूत रोपे तयार करणे.
- शाळेच्या रोपवाटिकेसाठी योग्य आणि दर्जेदार ग्रोइंग मिडिया तयार करणे.
- ग्रोइंग मिडियाचे प्रमाण (Ratio) निश्चित करणे.
- उच्च अंकुरण टक्केवारी मिळवणे = 90–95% अंकुरणाचे लक्ष्य.
- बुरशी व कीडरहित नर्सरी तयार करणे
- माध्यमाचा (Cocopeat/Soil Mix) pH व EC योग्य ठेवणे
- रोपांना संतुलित पोषण मिळावे.
- समान व जलद वाढ होणारी रोपे तयार करणे – ट्रेमधील सर्व रोपे एकसमान विकास.
- योग्य खत व्यवस्थापनाचा अवलंब करणे – EC नुसार nutrients देणे.
साहित्याची यादी :
- रोप वाढविण्याची ट्रे (Seedling tray)
- पालक बिया (Spinach seeds)
- काकडीच्या बिया (Cucumber seeds)
- झेंडूच्या बिया (Marigold seeds)
- नारळ शेंडीचे भूसे / कोकोपीट (Coco-peat)
- वर्मिक्युलाइट (Vermiculite)
- पर्लाइट (Perlite)
- पाणी कॅन
कृती नियोजन – कामाच्या पायर्या
5/12/2025
- आज मला अर्चना मॅडम आणि सायली दीदी यांनी नर्सरीबद्दल माहिती गोळा करण्यास सांगितले. त्यामुळे मी आज नर्सरीविषयी सर्व माहिती जमा केली.
मी अभ्यास केला की कोणती सीडलींग ट्रे (Seedling Tray) वापरावी, ग्रोइंग मिडिया (Growing Media) म्हणजे काय असते, नर्सरीमध्ये कोणते ग्रोइंग मिडिया वापरले जाते, तसेच नर्सरीमध्ये रोपांची काळजी कशी घेतली जाते इत्यादी बाबींबद्दल मी आज सविस्तर अभ्यास केला. - अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही Machar येथे असलेल्या नर्सरीशी संपर्क साधला. तेथील सरांशी फोनवर बोलून आम्ही खतांबद्दलची माहिती घेतली.
सरांनी आम्हाला नर्सरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सेंद्रिय व रासायनिक खतांबद्दल, तसेच त्यांचा वापराचा प्रमाण व पद्धत याबद्दल सविस्तर माहिती दिली.
6/12/2025
साहित्य गोळा करणे:
आज मी आवश्यक साहित्य गोळा केले. यात रोपवाटी ट्रे, बिया (पालक, काकडी, झेंडू), कोकोपीट, वर्मिक्युलाइट, पर्लाइट आणि पाणी कॅन यांचा समावेश आहे.
प्रत्यक्ष काम / अंमलबजावणी
6/12/2025
- कोकोपीट, वर्मिक्युलाइट आणि पर्लाइट यांचे 60:20:20 या प्रमाणात मिश्रण करून ग्रोइंग मीडियम तयार केले.
- तयार केलेले माध्यम (कोकोपीट मिश्रण) सीडलिंग ट्रेमध्ये भरले.
- त्यानंतर सीडलिंग ट्रेमध्ये प्रत्येक कप्प्यात एक-एक बी पेरली आणि त्या बियांना पुन्हा हलक्या थराने कोकोपीटने झाकले.
- त्यानंतर पाणी कॅनच्या साहाय्याने ट्रेला पाणी दिले आणि नंतर अंकुरणासाठी ट्रेला कव्हरने झाकले.



7/12/2025–8/12/2025–9/12/2025–10-12-2025
आज मी अंकुरणासाठी ठेवलेल्या सीडलिंग ट्रेला हलक्या हाताने पाणी दिले .
नोंद आणि निरीक्षण:
| नोंद | निरीक्षण: |
| 6/12/2025 | आज सीडलिंग ट्रे मध्ये बिया लावल्या काकडी – 303 पालक – 196 झेंडू – 46 |
| 13/12/2025 | आज काही प्रमाणात बियांचे अंकुरण झाले आहे रोपे दोन पानावर आली आहेत काकडी – 46 पालक – 159 झेंडू – 20 |
| 20/12/2025 | राहिलेल्या बियांचे पण अंकुरण झाले आहे रोपे दोन पानावर आहेत काकडी-50 पालक- झेंडू-24 |
16/12/2025
आज सगळ्या रोपांचे अंकुरण झाले आहे


17/12/2025-18/12/2025-19/12/2025
मी झाडांना पानी दिले आणि त्याचे निरीक्षण केले ती रोपे दोन पानावर आली आहेत.