29/04/2025
प्रसाद सर आणि अभिजीत सर यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्या चर्चेत असे ठरले की, आपल्याला विविध ड्रायरमध्ये ट्रायल घेऊन डेटा संकलित करायचा आहे आणि त्यासाठी टेक्नो पार्क ड्रायरचा वापर करायचा आहे असे ठरवले, त्या ड्रायरमध्ये कोणकोणत्या गोष्टींची कमतरता आहे हे पाहून घेतले आणि त्यानुसार ड्रायिंग चेंबरची मोजमापे घेतली व त्याची एक डिझाइन तयार केली.

त्यानंतर Techno Park ड्रायरमध्ये आधी काही ट्रे बनवून ठेवले होते. त्या ट्रेंची तपासणी केली, त्यांची रचना निरीक्षणात घेतली आणि ट्रेंमधील अंतर मोजून घेतले.आणि त्याचे एक डिझाइन कागदावर तयार करून घेतले.

यावरून असे लक्षात आले की काही वापरण्यायोग्य जागा सुटत आहेत. तर आपल्याला पूर्णपणे जागेचा वापर करायचा असेल, तर त्यासाठी आपण नवीन डिझाईन तयार केले पाहिजे. यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे डिझाइन करायचे आहे हे ठरवण्यासाठी संपूर्ण ट्रेचे क्षेत्रफळ(Area) काढले आणि त्यानुसार एका सिंगल ट्रेचे पृष्ठभाग क्षेत्रफळ(Surface area) मोजून घेतले.
Area=πr1²-πr2²
3.14×22500 – 3.14×225cm²
70650-706cm²
69944cm²
69944/4cm²
=17486/4cm²
=4,371.5cm²(for one tray)
4.705ft²(for one tray)
02/05/2025
Introduction : Firebase हे Google द्वारे विकसित केलेले एक Backend-as-a-Service (BaaS) म्हणजेच मागील बाजूस सेवा पुरवणारे प्लॅटफॉर्म आहे. हे मुख्यतः मोबाईल आणि वेब अॅप्लिकेशन्स तयार करणाऱ्या डेव्हलपर्ससाठी वापरले जाते.
Firebase कोणत्या प्रकारचे अॅप आहे:
Firebase हे स्वतः एक अॅप नाही, तर हे एक प्लॅटफॉर्म आहे जो वेगवेगळ्या सेवा (services) पुरवतो जसे की:
Authentication (लॉगिन/साइनअपसाठी)
Realtime Database (थेट डेटा स्टोअरिंग)
Cloud Firestore (advanced database)
Cloud Storage (फाईल्स साठवण्यासाठी)
डेटा लॉगरमध्ये प्रोग्रॅम कसा अपलोड करायचा हे मी माझी मैत्रीण तेजस्विनी कडून शिकून घेतले आणि त्यानंतर ती प्रक्रिया फॉलो केली आणि प्रोग्रॅम बनवायला शिकलो.
खालील स्टेप्स फाॅलो केलेल्या आहेत :
1)सर्वात आधी फायरबेसवर प्रोजेक्ट तयार केला.
2)त्यानंतर VS Code वर प्रोजेक्ट डिप्लॉय केला.
3)शेवटी Arduino चा कोड अपलोड केला.
या तीनही मुख्य पायऱ्या (steps) अनुसरल्या. फायदे:
स्वतःचा सर्व्हर किंवा backend लिहायची गरज नाही.
realtime डेटा अपडेट होतो.
सुरक्षित आणि स्केलेबल सेवा.
वापरण्यास सोपे SDK आणि डॅशबोर्ड.
03/05/2025
वायर्सला सोल्डर करणे

अॅल्युमिनियम तारेला हीट गनने तापवून वायरला सोल्डर केले.आणि वायर सोल्डर करून फिक्स केली.आणि डेटा लॉगर अॅसेंबल केला.

हॉट ग्लू गनने किट चिकटवून घेतले, ज्यामुळे ते बॉक्समध्ये फिट बसेल “त्यामुळे डिझाइन पूर्ण होऊ शकले नाही.”आणि हलणार नाही.
05/05/2025
“आपल्याला नवीन ट्रे बनवायचा आहे, त्यासाठी ट्रेचे डिझाइन तयार करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी त्याच्या सर्व बाजूंची माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही त्याच्या चारही बाजू मोजण्यास सुरुवात केली, पण त्यात थोडीशी चूक झाली.””त्यामुळे डिझाइन पूर्ण होऊ शकले नाही.”
07/05/2025
ट्रे तयार करण्यासाठी ट्रेच्या तीन बाजू काढण्यात आल्या, पण चौथी बाजू काढताना अडचण निर्माण झाली, त्यामुळे चौथी बाजू काढता आली नाही.
09/05/2025
उर्वरित चौथी बाजू सॉलिड वर्क्सच्या साहाय्याने काढली, तरीही दीक्षित सरांनी सांगितले की .आपण ती भूमीती वापरून काढावी. त्यामुळे त्याप्रमाणे चौथी बाजू काढण्यात आली आणि अशा पद्धतीने ट्रेच्या सर्व चारही बाजू तयार झाल्या व ट्रेचे डिझाईन पूर्ण झाले.
10/05/2025
प्रसाद सरांसोबत चर्चा झाली आणि नवीन फ्लॅट बेड तयार करायचा आहे असे ठरले. त्यासाठी मटेरियल लिस्ट तयार करण्यात आली आणि त्यानुसार साहित्य आणले. त्यानंतर मोजमाप घेऊन स्क्वेअर पाइप कापून घेतले आणि सर्व साहित्य एकत्रित करून ठेवले.
11/05/2025
नविन ट्रे तयार करणे
“नविन ट्रे बनवण्यासाठी त्याचे सर्व माप पूर्ण झाल्यानंतर आता ट्रे बनवायला घेऊ असे निश्चित झाले आणि ट्रे बनवायला सुरुवात केली.” नविन ट्रे बनवण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य जमा केले, त्यात फ्लॅट बार, L अँगल, नट-बोल्ट इत्यादी समाविष्ट आहेत.नाविन ट्रे बनवण्यासाठी, ट्रेच्या सर्व मापे मिळवल्यानंतर 65 सेंटीमीटर लांबीचे दोन L अँगल कापले, 15 सेंटीमीटर लांबीचे एक L अँगल कापले, आणि 118 सेंटीमीटर लांबीचा फ्लॅट बार कापला.यानंतर, तीनही कापलेले L अँगल निर्धारित अंतरावर वेल्डिंगद्वारे जोडले आणि फ्लॅट बार वाकवून, तोही वेल्डिंग करून जोडला. यानंतर, ४.७ चौ.फुट आकाराच्या पॉलीप्रॉपिलिन जाळी (mesh) कापून घेतली आणि पूर्ण ट्रेवर ड्रिलिंग करून छिद्रं तयार केली, ज्यामुळे जाळी व्यवस्थित बसवता येईल.यानंतर, पॉलीप्रॉपिलिन जाळी ट्रेच्या वर ठेवून, ती नट-बोल्टने सुरक्षितपणे जोडली. त्यानंतर, तयार केलेला ट्रे ड्रायिंग चेंबरमध्ये व्यवस्थित केलेला ठेवला.

12/05/2025
तयार केलेला सॅम्पल ट्रे स्ट्रक्चरपेक्षा मोठा झाला आहे, त्यामुळे त्याला ५ सेमीने कमी करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे ते स्ट्रक्चरमध्ये व्यवस्थित बसेल. म्हणून ट्रे दोन्ही बाजूंनी ५ सेंमीने कापून पुन्हा वेल्ड करून तयार करण्यात आला आणि त्यावर जाळी फिट करून स्ट्रक्चरवर ठेवली, तर ती योग्य प्रकारे बसली.
13/05/2025
तर याप्रमाणे मला ३० ट्रे बनवायचे आहेत, त्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी जमा केले, त्यात L अँगल, फ्लॅट बार इत्यादी सामील आहेत, आणि ठरलेल्या मोजमापानुसार त्यांची कापणी करून घेतली.आणि ग्राइंडरने ग्राइंड करून घेतले.
14/05/2025
सर्व कापलेले साहित्य वेल्ड करण्यासाठी घेण्यात आले. त्यासाठी CO2 वेल्डिंग वापरायचे ठरले कारण CO2 वेल्डिंगने वेल्ड मजबूत होते. म्हणून CO2 वेल्डिंगने वेल्ड करून घेतले आणि नंतर वेल्डला परत ग्राइंड करून घेतले.
16/05/2025
उरलेले ट्रे आज वेल्ड करुन जॉईंट केले; साहित्य अपुरे पडल्यामुळे काम पूर्ण झाले नाही.
17/05/2025
आज जेवढे साहित्य कमी पडले होते, त्याची यादी केली आणि नवीन साहित्य घेतले. त्यामध्ये २ L अँगल, २ फ्लॅट बार, ४५० स्क्रू आणि वॉशर इत्यादी साहित्य आणले. त्यांची कटिंग करून घेतली आणि नंतर वेल्ड करून जॉईंट केले. अशा प्रकारे सर्व ट्रे वेल्ड करून पूर्ण केले.
08/07/2025 TO 09/07/2025
टेक्नो पार्क ड्रायरच्या १८ ट्रे तयार करायचे बाकी होते, ते पूर्ण करून घेतले. म्हणजेच त्या ट्रेंवर पॉलीप्रॉपिलीन जाळी (mesh) लावून ती स्क्रू आणि वॉशरने घट्ट केली. हे काम पूर्ण केले आणि त्यासाठी मला आदित्यने मदत केली. तसेच काही प्रमाणात ही जाळी ट्रेच्या वर आलेली होती, म्हणून ती ट्रेच्या पृष्ठभागाच्या आकारानुसार कापून घेतली आणि हे सर्व ट्रे ड्रायरमध्ये ठेवले.
