24/07/2025 to 27/07/2025
परिचय:
आम्हाला अभिजीत सरांनी सांगितल्याप्रमाणे २ फ्लॅट बेड Dryer ची ऑर्डर आहे. ही ऑर्डर सावित्री स्किल शाळा, कमल विद्यालय, सावळे, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र येथून आहे.
हे काम पूर्ण करण्यासाठी मी आवश्यक साहित्याची यादी तयार केली व ते साहित्य खरेदी करून आणले. पुढील सर्व प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली.
१. साहित्य खरेदी व तयारी
- सर्वप्रथम फ्लॅट बेड ड्रायर तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार केली.
- बाजारातून आवश्यक साहित्य खरेदी करून आणले.
२. साहित्य कटिंग व फ्रेम तयार करणे
- DBRT विद्यार्थी तुषारच्या मदतीने साहित्याचे कटिंग केले.
- सर्वात आधी ड्रायरची साइड फ्रेम तयार केली.
- दुसऱ्या दिवशी संपूर्ण ड्रायरचे वेल्डिंग पूर्ण केले.
३. पावडर कोटिंगपूर्वीची स्वच्छता प्रक्रिया
- पावडर कोटिंग करण्यापूर्वी फ्रेम 3-in-1 लिक्विडने स्वच्छ धुतली.
- या लिक्विडमुळे मेटलवरील गंज पूर्णपणे निघून गेला.
- त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन फ्रेम वाळवली.

6/08/2025 TO 08/08/2025
आपल्या प्रकल्पांतर्गत 2 फ्लॅट बेड ड्रायर बनवण्याचे काम सुरू केले. त्यासाठी सर्वात पहिले ड्रायरचे फ्रेम तयार झालेले होते. त्या फ्रेमला गंज लागू नये म्हणून ग्रे कलरच्या पावडर कोटिंगने व्यवस्थित कोटिंग केले.
यानंतर हे फ्रेम हीटिंग चेंबरमध्ये ठेवून वाळवले. त्यामुळे कोटिंग अधिक टिकाऊ झाले.
दुसऱ्या दिवशी, ड्रायरसाठी प्लायवूड आणले. हे प्लायवूड 6 x 3 फूट मापानुसार कापून घेतले. त्यानंतर त्याला पाण्यापासून वाचवण्यासाठी ब्लॅक ताडपत्रीने पॅकिंग केले.
प्लायवुडवर ताडपत्री (tarpaulin) का फिट करतात यामागची कारणं:
1.ओलावा वाचवणे – प्लायवुडला पाणी, आर्द्रता किंवा पावसाचा थेंब लागला तर ते फुगते, वाकते किंवा खराब होते. ताडपत्री लावल्याने पाणी थेट प्लायवुडवर लागत नाही.
2.टिकाऊपणा वाढवणे – ताडपत्री प्लायवुडला बाहेरील हवामानापासून संरक्षण देते, प्लायवुड थेट हवामानाशी संपर्कात राहत नाही, त्यामुळे ते जास्त दिवस चांगले टिकते.
3.स्वच्छता व हायजिन – जिथे अन्नधान्य, धान्य किंवा प्रक्रिया केलेला पदार्थ ठेवतात, तिथे प्लायवुडवर थेट पदार्थ ठेवल्यास धूळ, लाकडाचा बुरशी किंवा कीटकांचा धोका असतो. ताडपत्रीमुळे एक सुरक्षित, स्वच्छ पृष्ठभाग तयार होतो.
4.उष्णता शोषण – काळा रंग उष्णता पटकन शोषतो, त्यामुळे आत ठेवलेला माल (भाज्या, धान्य इ.) लवकर वाळतो.
यानंतर पुढील टप्प्यात, पॉलीकार्बोनेट शीट्सचे मोजमाप घेऊन त्यांचे कटिंग केले. ही शीट्स नंतर फ्रेममध्ये बसवण्यात आल्या.
या कामामध्ये DBRT विद्यार्थी आयुष याने मदत केली. त्याच्या मदतीने सर्व शीट्स योग्य पद्धतीने फ्रेमला फिट करण्यात आल्या.
फ्लॅट बेड ड्रायरची सुरक्षित पॅकिंग आणि वाहतूक
12/08/2025 to 13/08/2025
आम्ही तयार केलेले फ्लॅट बेड ड्रायर पूर्णपणे वापरण्यास तयार झाले. हे ड्रायर सुरक्षितपणे त्यांच्या ठिकाणी पोहोचावेत यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. सर्वप्रथम प्रत्येक ड्रायरला बाहेरून पुठ्ठ्याने (कार्डबोर्ड) आच्छादित करून नीट पॅक करण्यात आले. नंतर त्या पुठ्ठ्यावर सेलोटेप लावून घट्ट सील केले, ज्यामुळे वाहतुकीदरम्यान कोणतीही हानी होऊ नये.

फ्लॅट बेड ड्रायरची सुरक्षित पॅकिंग आणि वाहतूक
आम्ही तयार केलेले फ्लॅट बेड ड्रायर पूर्णपणे वापरण्यास तयार झाले. हे ड्रायर सुरक्षितपणे त्यांच्या ठिकाणी पोहोचावेत यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. सर्वप्रथम प्रत्येक ड्रायरला बाहेरून पुठ्ठ्याने (कार्डबोर्ड) आच्छादित करून नीट पॅक करण्यात आले. नंतर त्या पुठ्ठ्यावर सेलोटेप लावून घट्ट सील केले, ज्यामुळे वाहतुकीदरम्यान कोणतीही हानी होऊ नये.

ही दोन्ही फ्लॅट बेड ड्रायर DTDC कुरिअर सेवा मार्फत कर्जत येथे सुरक्षितपणे पाठवण्यात आले. या प्रक्रियेमुळे उपकरणे सुरक्षित, स्वच्छ आणि कोणत्याही नुकसानाविना ठिकाणी पोहोचली.