आताच्या धावत्या युगात पाणी टंचाई तर वस्तुस्थिती आहेच पण सांडपाणी व्यवस्थापन हा हि एक गंभीर मुद्दा झाला आहे. मोठ्या शहरं मध्ये परिस्थिती खूप बिकट आहे कारण ते सांडपाणीएकत्र करतात पण त्यावर पुरेशी प्रक्रिया होत नाही त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते जर आपल्याकडे पुरेशी मोकळी जागा किंवा बाग असेल तर रीड बेड पद्धत हि सांडपाणी व्यवस्थापनाचा पर्यावरण स्नेही मार्ग आहे.
मग रीड बेड म्हणजे काय?
विशिष्ट वातावरणात वाढवून प्रक्रियेसाठी तयार केलेली झाडे आणि सांडपाण्याच्या प्रतिप्रमाणे त्यात वापरण्यासाठी तयार केलेले जिवाणू मिश्रण अशा दोन घटकांच्या साहाय्याने केलेली सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया म्हणजे रीड बेड होय. इंग्लिश मध्ये ज्या वनस्पतीच्या प्रजाती जास्त पाण्यांत चांगल्या जगू शकतात , ज्यांना पाणी खूप आवडते त्यांना रीड असे म्हणले जाते , म्हणून अशा वनस्पतींचा वापर करून केलेले पाणी शुद्धीकरण प्रक्रियेला रीड बेड असे म्हणतात हिला रूट झोन असेही म्हणतात कारण हि संपूर्ण प्रक्रिया झाडांची मूळे आणि जिवाणू यांच्या कामा मूळे होते
पाणी शुद्धीकरण प्रक्रिया:
जस कि आपण वरती म्हणालो रीड बेड, हि प्रक्रिया विशिष्ठ प्रकारे वाढलेले झाडांची मूळे आणि अत्यंत प्रभावी जिवाणू मिश्रण यांचा वापर करून सांडपाणी शुद्ध केलं जात।यामध्ये प्रामुख्याने झाडाच्या मुळांचा उपयोग पाणी गाळून घेण्यासाठी तसेच कचरा विघटनासाठी लागणार ओक्सयजन(oxygen) पुरवण्यासाठी होतो तर जिवाणू त्या कचऱ्याचे विघटन करतात
1.या प्रक्रियेमध्ये सुरवातीला पाणी एका सुयोग्य ठिकाणी एकत्रित केले जाते त्यानंतर हे पाणी रीड बेड सिस्टिम मध्ये सोडले जाते हे पाणी एका टोकाकडून दुसरीकडे जाईपर्यँत त्यावर झाडांच्या मुळाशी जिवाणूंच्या साहाय्याने प्रक्रिया केले जाते
2.पूर्व तयारी म्हणून आधीच उपलभ सांडपाण्याचे गणित मांडून त्या नुसार टाकीचे बांधकाम केले जाते त्या टाकीत योग्य प्रकारे दगड गोटे, रेती, माती यांचे थर रचले जातात.
3.हा थर भरताना त्यात विशिष्ठ जिवाणूंचे मिश्रण नीट मिसळले जाते आणि मग विशिष्ट पद्धतीने वाढलेली निवडक झाडे यात लावली जातात. हि झाडे जमिनीखाली एक उत्तम जाळं तयार करतात आणि जिवाणूच्या साहाय्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करतात.
4.प्रक्रिया झालेले पाणी टाकीच्या दुसऱ्या टोकाकडून एका उघड्या टाकीत किंवा तलावात सोडले जाते तिथे त्यामध्ये सूर्यप्रकाश जाईल याची सोया केली जाते.
5.काही काळ हे पाणी टाकीत ठेवून मग दुसरी कडे दुय्यम वापरासाठी नेले जाते. खालील आकृती वरून रीड बेड सिस्टिम चे काम स्पष्ठ होईल.