19/09/2025
शेतीतील समस्या ओळखण्यासाठी केलेली भेट
प्रसाद सर आणि अभिजीत सर यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून कळले की आपल्या इथे विज्ञान आश्रमामध्ये IIT Bombay आणि पवाई येथून E-Yantra स्पर्धेसाठी विद्यार्थी येणार आहेत. या विद्यार्थ्यांना शेतातील वास्तव समस्या शोधण्यासाठी काही शेतकऱ्यांशी भेट घ्यावी लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर आम्ही काही शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.
22-२३ सप्टेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांना शेतभेटीसाठी आणण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
यासाठी आम्ही रेटेवाडी गावातील श्री. ज्ञानेश्वर काशीद यांच्याकडे भेट दिली. त्यांनी दोन दिवसांचा वेळ देण्याची तयारी दर्शवली.
तसेच पाबळ, खैरेनगर येथील श्री. चेतन घारे यांच्याकडेही आम्ही भेट दिली. त्यांनीदेखील आमच्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेता येतील आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर उपाय शोधण्याचा मार्ग मोकळा होईल.
आज पूर्ण दिवस त्या सर्व मुलांसोबत पुढील दिवसाबद्दल चर्चा झाली.

शेतभेट आणि विद्यार्थ्यांचा अनुभव
22-23/09/2025
आज सर्व मुलांचे गट करण्यात आले. प्रत्येक दोन गटांसोबत एक-एक DIC फेलो आणि इंटर्न्स मार्गदर्शनासाठी ठेवले. माझ्यासोबत असलेल्या दोन गटांना मी श्री. धनंजय घोडेकर या शेतकऱ्याकडे त्यांच्या शेतावर घेऊन गेलो.
त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी टोमॅटो, भेंडी, मिरची आणि कांदा या पिकांबद्दल सविस्तर माहिती घेतली. दोन दिवसांच्या या भेटीदरम्यान त्यांना शेतकऱ्यांकडून वास्तव माहिती मिळाली तसेच शेतात येणाऱ्या समस्याही त्यांनी नीट समजून घेतल्या.
यानंतर विद्यार्थी पुन्हा विज्ञान आश्रमात परतल्यानंतर त्या समस्यांवर सखोल चर्चा झाली. अशीच दुसऱ्या दिवशीही भेट पार पडली. नंतर विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून मिळालेल्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे PPT प्रेझेंटेशन सादर केले.
या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतातील अडचणी समजल्या आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्याची संधी मिळाली.