अलीकडेच 14 Trees Foundation या संस्थेसोबत प्रसाद सरांचे बोलणे झाले. त्या चर्चेतून सरांनी आम्हाला सांगितले की संस्थेला आपल्या ठिकाणी सोलार ड्रायरवर Grass आणि Herbs वाळवून पाहायचे आहे. या कल्पनेतून एक नवा प्रयोग करण्याची दिशा मिळाली.

नमुने प्राप्त:

बुधवारी योगिता मॅडम स्वतः आश्रमात आल्या आणि त्यांनी २९ प्रकारचे Grass आणि Herbsचे नमुने आम्हाला दिले. हे नमुने सोलार ड्रायरमध्ये वाळवण्यासाठी वापरायचे आहेत.

चर्चा व नियोजन :

नमुने मिळाल्यानंतर त्यांची मांडणी कशी करायची, ट्रेवर योग्यरित्या ठेवण्याची पद्धत, तसेच नंतरचे गुणवत्ता परीक्षण यावर सविस्तर चर्चा झाली.

20/09/2025

आज सर्व नमुने वेगवेगळे करून घेतले. हे सर्व २९ नमुने वेगवेगळ्या प्लॉटमधील असल्याने त्यांची स्वतंत्रपणे वर्गवारी केली. त्यानंतर त्यांचा LOD काढण्यास सुरुवात केली.”

अशा प्रकारे Grass आणि Herbsचे वेगवेगळे नमुने आहेत.

26/09/2025

14 Trees Foundation ने काढलेले सर्व नमुने आज वाळवण्यासाठी सौर डोम ड्रायरमध्ये ठेवले. हे सर्व नमुने वेगवेगळ्या प्लॉटवरून आल्यामुळे त्यांची वेगवेगळी ओळख ठेवणे गरजेचे होते. त्यासाठी प्रत्येक नमुना वेगळ्या ट्रेमध्ये ठेवून त्याचे वजन केले. त्यानंतर त्या-त्या प्लॉटनुसार स्टिकरवर नाव लिहून ट्रेला चिकटवले, ज्यामुळे नमुने सहज ओळखता येतील. सर्व ट्रे आज सौर वाळवण यंत्रामध्ये ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून नमुने योग्य प्रकारे वाळतील आणि पुढील अभ्यासासाठी साठवता येतील.