
अझोला ही लहान, जलचर फर्नची एक प्रजाती आहे जी त्यांच्या जलद वाढीसाठी आणि नायट्रोजन-फिक्सिंग सायनोबॅक्टेरियमशी सहजीवन संबंधासाठी ओळखली जाते. सामान्यतः मॉस्किटो फर्न, वॉटर वेल्वेट किंवा फेयरी मॉस म्हणून ओळखले जाणारे, ते गोड्या पाण्याच्या पृष्ठभागावर दाट, हिरवे बनते.
मुख्य उपयोग आणि फायदे:
सेंद्रिय खत (Biofertilizer):
अझोला हवेतील नायट्रोजन शोषून घेते आणि त्याचे रूपांतर वनस्पतींना वापरता येणाऱ्या स्वरूपात करते, ज्यामुळे भात आणि इतर पिकांच्या वाढीसाठी ते एक उत्तम नायट्रोजन खत ठरते.
हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवते आणि मातीची सुपीकता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते.
पशुखाद्य (Livestock Feed):
अझोला प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने ते पशुधनासाठी एक आदर्श आणि स्वस्त आहार आहे.
विशेषतः गाई, म्हशी, बदके, मासे आणि कोंबड्यांसाठी ते पौष्टिक असल्यामुळे दूध आणि अंड्यांचे उत्पादन वाढते, असे दिसून आले आहे.
पर्यावरणाचे फायदे:
ते पाण्यातील डासांची उत्पत्ती नियंत्रित करते, कारण ते पाण्यावर तरंगते आणि डासांच्या अळ्यांसाठी नैसर्गिक अधिवास कमी करते.
अझोला जड धातू आणि इतर विषारी पदार्थ शोषून घेते, त्यामुळे ते सांडपाणी प्रक्रिया आणि जलशुद्धीकरणासाठी उपयुक्त आहे.
जमिनीची गुणवत्ता सुधारणे:
अझोलाचा जमिनीत समावेश केल्याने कंपोस्ट (ह्युमस) तयार होते, ज्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि जमिनीचे व पाण्याचे विघटन सुधारते.
हे पाण्यातील तण वाढण्यास प्रतिबंध करते, कारण ते तलावाच्या पृष्ठभागावर पसरून इतर जलचरांना वाढण्यास अडथळा निर्माण करते.
- पॉलीहाऊस मधील ४ ही बेड पिवळसर दिसायला लागेल होते. दीक्षित सरांसोबत बोलून मी एका ट्रे मध्ये थोडासा अझोला बाहेर sunlight मध्ये आणून ठेवला .त्यावरून असे समजले कि पॉलीहाऊस मधील अझोला बेड लाsunlight कमी पडत आहे .
पॉलीहाऊस मधील ४ ही बेड पिवळसर दिसायला लागेल होते. दीक्षित सरांसोबत बोलून मी एका ट्रे मध्ये थोडासा अझोला बाहेर sunlight मध्ये आणून ठेवला .त्यावरून असे समजले कि पॉलीहाऊस मधील अझोला बेड लाsunlight कमी पडत आहे .

13/09/2025
ट्रे मधील अझोला हिरवा झाल्यानंतर पॉलीहाऊस मधील अझोलाचा एक बेड बाहेर शिफ्ट केला .

- १ kg Harvest केला .
18/10/2025
दीक्षित सरांसोबत चर्चा केली त्यात त्यांनी अझोला च्या ट्रायल सुरुवातीला ४ ट्रे मध्ये घ्यायला सांगितली .
3/11/2025
४ ट्रे घेतले. प्रत्येक ट्रे मध्ये १ kg माती घेतली .
TREY no.१ – १ kg माती + पाणी
Trey no.२ – १ kg माती + पाणी + बायोगॅस स्लरी
Trey no.३ – १ kg माती + पाणी + बायोगॅस स्लरी + PH Maintain ठेवणे .
Trey no.४ – १ kg माती + पाणी + SSP + PSB


4 Different condition Trey :

4 Trey PH Count :
| Date | Trey No : 1 | Trey No : 2 | Trey No : 3 | Trey No : 4 |
3/11/2025 | 6.88 | 6.75 | 6.85 | 6.98 |
| 5/11/2025 | 6.82 | 7 | 7.5 | 6.98 |
| 7/11/205 | 6.8 | 7 | 7.8 | 6.8 |
| 9/11/2025 | 6.82 | 7.5 | 7.8 | 6.8 |
| 11/11/2025 | 6.95 | 7.26 | 7.20 | 7.10 |
| 13/11/2025 | 7.10 | 7.21 | 7.20 | 7.11 |
| 15/11/2025 | 7.7 | 7 | 7.20 | 7.15 |
| 17/11/2025 | 7.8 | 7.20 | 7.60 | 7.20 |
| 19/11/2025 | 7.14 | 7.21 | 7.20 | 7.20 |
29/11/2025
अझोला च्या एकाही ट्रे मध्ये वाढ दिसत नव्हती. अझोला खराब होत होता .
दीक्षित सरांसोबत चर्चा केली. त्यात सरांनी ४ ट्रे मधील २ ट्रे काढायला सांगितले व त्यात दुसरी माती टाकून निरीक्षणे घ्यायला सांगितली.
त्या प्रमाणे २ ट्रे लावले आहेत आणि त्याचा PH maintain करून PH चेक करत आहे .
| Date | Tray – 1 (PH maintain) | Tray -2 |
| 1/12/2025 | 8 | 8 |
| 3/12/2025 | 7 | 8 |
| 5/12/2025 | 7.5 | 8.5 |
| 9/12/2025 | 7.8 | 8.8 |
| 11/12/2025 | 7.8 | 8.9 |
| 14/12/2025 | 4 | 8.8 |
| 21/12/2025 | 6.8 | 8.9 |
| 23/12/2025 | 7.72 | 8.14 |
| 25/12/2025 | 7.40 | 8 |
| 27/12/2025 | 7.50 | 7.89 |
| 30/12/2025 | 8 | 8.5 |