14/08/2025

१४ तारखेला दिक्षीत सर आणि गणेश पिंगळे सर यांच्यासोबत एक चर्चा झाली. या चर्चेदरम्यान गणेश सरांनी सांगली येथून काला ओला मसाला आणला असून, तो आपण ड्रायरमध्ये सुकवून त्याची गुणवत्ता, सुकवणीनंतरचे वजन, चव व टिकवण क्षमता यावर प्रयोग करणार आहोत असे सांगितले.

ग्रेवी मसाला – उत्पादक माहिती

नाव: सौ. स्वाती अतुल गवंडी
गट: उद्योगिनी महिला संघ
गाव: तडसर
तालुका: कडेगाव
जिल्हा: सांगली
उत्पादन प्रकार: ओला मसाला

चर्चेतील मुद्दे:

काला मसाला हा सांगली परिसरातील पारंपरिक आणि लोकप्रिय मसाला प्रकार आहे.

बाजारात त्याची मागणी जास्त असून त्याचे दीर्घकाळ साठवण आणि वाहतुकीसाठी सुकवणी अत्यावश्यक आहे.

ड्रायरच्या सहाय्याने मसाला सुकवल्यास त्याचा रंग, सुगंध आणि चव अधिक काळ टिकून राहील.

वाळवणी प्रक्रियेचे तपशील:

सुरुवातीचे वजन: 100 ग्रॅम

सुरुवातीची वेळ: दुपारी 2:55 वाजता

ड्रायर तापमान: 52°C

तपासणी: दर 1 तासांनी मसाल्याची स्थिती तपासली

शेवटची वेळ: रात्री 9:55 वाजता

एकूण वाळवणी कालावधी: 7 तास

Observation:

अंतिम वजन: 25 ग्रॅम

काढलेले पाणी: 75ग्रॅम (100g – 25g)

वाळवणीनंतर काढलेले पाण्याचे प्रमाण.

= 75%

= 75% म्हणजे या काळ्या मसाल्यातून 75% ओलावा (पाणी) वाळवणी प्रक्रियेत बाहेर गेला.

Observation:

या प्रयोगातून दिसून आले की 52°C तापमानावर इलेक्ट्रिक ड्रायरमध्ये 7 तासांत काळा मसाला पूर्णपणे वाळवता येतो. अंतिम मसाला 25 ग्रॅम एवढा राहिला आणि त्यातील 75% पाणी निघून गेले.
प्रति तास पाणी कमी झाल्याचे प्रमाण (सरासरी):

एकूण पाणी निघाले: 75 g

एकूण वेळ: 7 तास

सरासरी प्रति तास पाणी कमी झाले = 75 ÷ 7 = ~10.71 g/hour

म्हणजे साधारण 10.71 ग्रॅम प्रति तास (सरासरी).

ओल्या मसाल्याचे ड्रायिंग, रीहायड्रेशन व शेल्फ लाइफ चाचणी

19/08/2025

आम्ही एका पॅकेटमधील 100 ग्रॅम ओला मसाला ड्राय करून चाचणीसाठी ठेवला. हा मसाला उद्योगिनी महिला संघ, सांगली येथे पाठवण्यात आला.

यानंतर दुसऱ्या 100 ग्रॅम ओल्या मसाल्याचे ड्रायिंग केले असता, तो वाळून 25 ग्रॅम ड्राय मसाला मिळाला. या ड्राय मसाल्याचा रीहायड्रेशन प्रयोग करण्यासाठी 75 ग्रॅम गरम पाण्यात मसाला मिसळण्यात आला. तयार झालेल्या मिश्रणातील 50 ग्रॅम मसाला रिटॉर्ट पॅकिंगमध्ये भरून ठेवला, ज्यामुळे त्याची शेल्फ लाइफ तपासता येईल. उरलेला 50 ग्रॅम मसाला परत ड्राय करण्यासाठी ठेवला आणि पूर्ण वाळल्यानंतर त्याचे पॅकिंग करून तोही शेल्फ लाइफ चाचणीसाठी साठवण्यात आला.

Retort Packing म्हणजे एक विशेष प्रकारची पॅकिंग पद्धत, ज्यात अन्नपदार्थ किंवा इतर उत्पादने उच्च तापमान आणि दाब वापरून निर्जंतुकीकरण (Sterilization) केली जातात आणि हवाबंद (Airtight) पॅकमध्ये सील केली जातात.

उपयोग:

अन्न जास्त दिवस खराब न होता टिकवण्यासाठी

रासायनिक संरक्षक (Preservatives) न वापरता शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी

रेडी-टू-ईट (Ready-to-Eat) पदार्थ, करी, मसालेदार भाजी, इत्यादींसाठी

या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश म्हणजे ओल्या मसाल्याचे ड्रायिंग, रीहायड्रेशन व पॅकिंग तंत्रज्ञानाची प्रभावीता तपासणे आणि त्याची टिकाऊपणा (shelf life) समजून घेणे.