07/06/2025
नंदुरबार येथे तोडंबी फळे वाळवण्यासाठी फ्लॅट बेड ड्रायर तयार करून पाठविण्यात आला. या ड्रायरच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना तोडंबी फळे वाळवणे अधिक सुलभ, जलद आणि फायदेशीर होणार आहे.
सध्या नंदुरबार परिसरात मोठ्या प्रमाणावर तोडंबीचे उत्पादन होते. मात्र, योग्य वाळवणीच्या सुविधेअभावी या फळांचे वेळेवर प्रक्रिया होऊ शकत नाही, परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे लक्षात घेऊन, वाळवण प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच फ्लॅट बेड ड्रायरचा वापर करण्यात आला.
या ड्रायरव्दारे कमी वेळेत व उच्च दर्जाचे वाळवलेले तोडांबी फळ उपलब्ध होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात चांगला दर मिळेल आणि ह्या प्रक्रियेमुळे फळांची गुणवत्ता टिकून राहते.


Loss of Water Percentage and Solid Content
- सुरूवातीचे वजन (सकाळ, दिवस 1): 820g.

- पहिल्या दिवशी संध्याकाळी (वाळल्यानंतर): 355g
- दुसऱ्या दिवशी सकाळी: 390g ( reabsorbtion of moisture )
- दुसऱ्या दिवशी संध्याकाळी: 366g.

Loss of Moisture
- पहिल्या दिवशी :
- पाणी कमी झाले = 820 − 355 = 465g.
- पाण्याचा टक्केवारीतील तोटा = (465 / 820) × 100 ≈ 56.7%
- दुसऱ्या दिवशी (सकाळ ते संध्याकाळ):
- पाणी कमी झाले = 390 − 366 = 24g.
- पाण्याचा टक्केवारीतील तोटा = (24 / 390) × 100 ≈ 6.15%
Solid Mass
- पहिल्या दिवशी वाळल्यानंतर : 355g.
- दुसऱ्या दिवशी वाळल्यानंतर: 366g.
महत्त्वाच्या गोष्टी आणि अतिरिक्त माहिती
- पाणी शोषण्याची प्रक्रिया:
355 ग्रॅम (संध्याकाळ) ते 390 ग्रॅम (सकाळ) या वाढीवरून दिसते की, बिया हवेतून पुन्हा पाणी शोषू शकतात, विशेषतः ओलसर वातावरणात. हे बियांच्या वाळवण प्रक्रियेत सामान्य आहे. ( Due to Humidity ) - वाळवण प्रक्रिया:
- पहिल्या टप्प्यात जास्त पाणी लगेच निघून जाते (56% पेक्षा जास्त एका दिवशी).
- पुढील वाळवणात पाणी कमी प्रमाणात निघते, कारण आता उरलेले पाणी बियांच्या आतील भागात घट्ट असते.
- बिया योग्यरित्या साठवण्यासाठी आणि पुढील प्रक्रिया करण्यासाठी काही प्रमाणात moisture आवश्यक आहे.(8–15% ओलावा, वेट बेसिस).
- वाळवणाची टप्पे:
- पहिल्या टप्प्यात बाह्य पृष्ठभागावरील पाणी लगेच निघते.
- नंतरच्या टप्प्यात आतील पाणी हळूहळू बाहेर येते, हे वातावरणातील तापमान आणि ओलाव्यावर अवलंबून असते.
Overview Table
Stages | Weight (gm) | Water Loss (gm) | Water loss Percentage | Note |
---|---|---|---|---|
पहिला दिवस सकाळ | 820 | – | – | Fresh Seeds |
दिवस 1 संध्याकाळ | 355 | 465 | 56.7% | वाळल्यानंतर |
दिवस 2 सकाळ | 390 | -35 (वाढले) | – | रात्री पाणी शोषले |
दिवस 2 संध्याकाळ | 366 | 24 | 6.15% | दुसऱ्या दिवशी वाळल्यानंतर |
Conclusion
- दोन दिवस वाळल्यानंत Total Water loss: 820 − 366 = 454g.
- Final Dry Solid Weight: 366g
- Loss of Total Water Percentage: (454 / 820) × 100 ≈ 55.4%
आंब्यापासून आमचूर बनवणे
09/06/2025
नंदुरबार परिसरात मे आणि जून महिन्यांत मोठ्या प्रमाणावर आमचूरचे उत्पादन घेतले जाते. या काळात कच्च्या आंब्यापासून आमचूर तयार केला जातो. पारंपरिक पद्धतीने वाळवणीला वेळ लागतो आणि गुणवत्ताही कमी होते. यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आमचूर वाळवण्याच्या प्रक्रियेत फ्लॅट बेड ड्रायर वापरून आमचूर वाळवण्याचे ठरवले.
यासाठी एक प्रायोगिक चाचणी (ट्रायल) घेतली जाणार आहे, ज्यामध्ये आमचूर फ्लॅट बेड ड्रायरमध्ये वाळवला जाईल. या प्रक्रियेतून उत्पादनाचा दर्जा, वाळवणीचा कालावधी, आणि आवश्यक तापमान/आर्द्रतेचा डेटा गोळा केला जाणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने आमचूर वाळवणीची माहिती देणे, तसेच प्रक्रिया सुलभ व फायदेशीर बनवणे. यामुळे भविष्यात अधिक उत्पादनक्षम आणि दर्जेदार आमचूर तयार करणे शक्य होईल.
Day wise deta:
पहिला दिवस:


सकाळी कच्च्या आंब्याची साल काढून कैरीचे ४ खाप केल्या. एकूण 1185g आमचूर ड्रायिंगसाठी फ्लॅट बेड ड्रायरमध्ये ठेवले.
संध्याकाळी 6 वाजता वजन घेतले असता ते 445g झाले.
दुसऱ्या दिवशी:

सकाळी पुन्हा आमचूरचे वजन घेतले असता ते 460g झाले, म्हणजे रात्री आमचूराने आर्द्रता (moisture) शोषली होती.
संध्याकाळी अंतिम वाळवलेले वजन हे 313g निघाले.T
Data Table:
दिवस | वेळ | प्रक्रिया | Weight (g) | NOTE |
---|---|---|---|---|
1 | सकाळ | कैरीचे 4 खाप, वजन | 1185 | सुरुवातीचे वजन |
1 | संध्याकाळ | वाळवणीनंतर वजन | 445 | फ्लॅट बेड ड्रायरमध्ये ड्रायिंगनंतर |
2 | सकाळ | वाळवलेले आमचूर, पुन्हा वजन | 460 | Reabsorbing moisture |
2 | संध्याकाळ | अंतिम ड्राय वजन | 313 | पूर्ण वाळवलेले |
MOISTURE CONTENT:

Conclusion :
या दोन दिवसांच्या आमचूर वाळवणी प्रक्रियेवरून असे स्पष्ट होते की फ्लॅट बेड ड्रायर चा वापर करून आमचूर यशस्वीपणे वाळवता येतो. पहिल्या दिवशी एकूण 1185 ग्रॅमपासून सुरुवात करून शेवटी 313 ग्रॅम शुष्क आमचूर मिळाले. यामध्ये एकूण 73.56% आर्द्रता कमी झाल्याचे नोंदले गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी वजन वाढल्याचे निरीक्षण झाले, हे हवेमधून ओलावा शोषल्यामुळे घडले. हे लक्षात घेता, रात्रीच्या वेळी ड्रायर बंद असताना पदार्थ योग्यरित्या झाकून ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून परत आर्द्रता शोषली जाणार नाही.
एकूणात ही चाचणी यशस्वी ठरली असून, भविष्यात मोठ्या प्रमाणात आमचूर निर्मितीसाठी हा पद्धतीचा विश्वासाने वापर करता येईल. आर्द्रतेवर सतत लक्ष ठेवणे आणि दर टप्प्यावर वजन मोजणे महत्त्वाचे आहे.
Todambi full dryer trial
12 जून रोजी फ्लॅट बेड ड्रायरवर तोंडंबी वाळवण्याची ट्रायल घेतली . ड्रायरची पूर्ण क्षमता 5 किलो असल्याने तितकीच तोंडंबी वापरण्यात आली. तोंडंबी फोडून तिच्या बिया वेगळ्या करण्यात आल्या आणि सकाळी 10 वाजता ड्रायरमध्ये तोंडंबी वाळवण्यासाठी ठेवले.

Todambi Drying Report
Trial time:
पहिला दिवस: सकाळी 10 वाजता ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत
दुसरा दिवस: सकाळी 9 वाजता ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत
Data Table:
दिवशीचा वेळ | वजन (ग्राममध्ये) | वजन (किलोमध्ये) |
---|---|---|
पहिला दिवस 10 AM | 5000g | 5.000 kg |
पहिला दिवस 6 PM | 2883g | 2.883 kg |
दुसरा दिवस 9 AM | 2627g | 2.627 kg |
दुसरा दिवस 6 PM | 2490g (Final) | 2.490 kg |
Calculations:
1️⃣ एकूण घसलेले वजन (Total Weight Loss)
= सुरुवातीचे वजन – अंतिम वजन
= 5000g – 2490g = 2510g
2️⃣ Moisture Content (%):
Moisture % = (Initial Weight – Final Weight) / Initial Weight × 100
= (5000 – 2490) / 5000 × 100
= 2510 / 5000 × 100
= 50.20%
3️⃣ Solid Content (%):
Solid % = Final Weight / Initial Weight × 100
= 2490 / 5000 × 100
= 49.80%
Conclusion:
Todambi वाळवणी प्रक्रियेमध्ये 2 दिवसांत सुमारे 50.20% आर्द्रता कमी झाली असून 49.80% solids शिल्लक राहिला.