चिखली फिश फार्म

उदिष्ट :- श्री दादा महाराज नाटेकर ज्ञान प्रबोधिनी शाळा ,चिखली .[ IBT विभाग ]या शाळेचे स्विमिंग फुल होते . ते दोन महिने वापरात असे.उरलेले दहा महिने मेंटेनन्स करणे अडचणीचे असल्याने ते रिकामे रहायचे .मग या दहा महिन्यात फिश फार्मिंग करून उत्पादन काढणे व तेथील IBT शिकणाऱ्या मुलांना या विषयातील ज्ञान व सायन्स शिकवणे या उद्देशाने ही सिस्टीम डिझायनिंग केली .

स्विमिंग पूल ची रचना व पाण्याची प्लम्बिंग लक्षात घेऊन या तळ्याचे मेजरमेंट घेऊन स्केच बनवले .

या स्केच मध्ये १८*५३ फुटाचे तळे ,५२*१३ फुटाचे पॉलिहाउस व यामध्ये पाणी फिल्टर करण्यासाठी व भाजीपाला व फळभाज्यांचे उत्पादन घेण्यासाठी १*१ मीटर चे २२ ग्रो बेड आहेत . NH३ \NH ४ चे रुपांतर NO३ मध्ये करण्यास दोन स्लच टँँक दिले आहेत .

ड्रॉईंग प्रमाणे पॉलहाउस चे काम सुरु केले . पॉलहाउस साठी 50MM JI पाईप चे स्ट्रक्चर तेथे असलेल्या भिंती प्रमाणे उंची घेतल्यामुळे to सपोर्ट मिळाला .यावर प्लेट ला होलपास घेऊन त्या भिंतीवर ब्लॉक तयार करून कॉक्रीट ने ते ब्लॉक भरून घेतले .व जमिनीवर १*१ फुटाचे खड्डे घेऊन पोल उभे केले .यावर १३ फुटाच्या ६ कैच्या नट बोल्टिंग करून फिटिंग केली .व पॉलहाउस ला दोन दरवाजे ठेवले .

पॉलहाउस च्या फ्रेम ला प्रोफाईल लाऊन पूर्ण पॉलहाउस ला २५० मायक्रोन जाडीचा पॉलीथीन चा पेपर स्प्रिंग अडकून तान काढून लावला . पॉलहाउस मधील गरम हवा बाहेर काढायला पंखा लावला .जेणेकरून तापमान व आद्रता मेन्टेन ठेवता येइल.

पॉलहाउस मध्ये ग्रो बेड व स्लच टँक करण्यासाठी रांजणगाव स्क्र्याब यार्ड मधून IBC टाक्या आणून ग्रो बेड साठी अर्ध्या कट करून घेतल्या .या टाक्या स्वच्छ करून त्या फ्रेम मध्ये बसून घेऊन पूर्ण सेटअप करण्यासाठी साहिड वर आणल्या . पॉलहाउस मध्ये दोन रांगांमध्ये ११ *११ IBC लावले .

दोन IBC स्लच टँक म्हणून वापरले .या २२ IBC एकमेकांना U ट्यूब सायफन ने कनेक्ट करून ,दोन रांगांचे दोन प्रमुख फ्लड & ड्रेन चे सायफन प्लम्बिंग तळ्यात सोडली . जेणेकरून २२ IBC एकाच वेळी भरून ते फ्लड & ड्रेन सायफन ने खाली होवून ते पाणी फिश टँक मध्ये येईल अशी प्लम्बिंग केली .

प्लम्बिंग पूर्ण झाल्यानंतर या ग्रो बेड मध्ये विटांचे तुकडे टाकून वरून ग्रीन शेडनेट टाकून यावर हलका ,मातीचा थर दिला .जेणेकरून विटांच्या तुकडे रोपांच्या मुळाना आधार देतील .शेडनेट मातीला पाण्यासोबत व्हावून जाऊ नये व भाजीपाला लावण्यास उपयोगी येईल .

ग्रो बेड तयार झाल्यानंतर या मध्ये टोमॅटोची रोपे एका ग्रो बेड मध्ये ४ अशी रोपे लावली .व आंतर पिक म्हणून पालक ,लेटूस लावले ,चार ग्रो बेड मध्ये अळू लावला .

टोमॅटोची रोपे एक- दोन फुटांची झाल्यानंतर सुतळीने त्यांना बांधले व त्यांना आधार साठी मुळांवर थोडी मातीचा थर दिला .

फिश टँक मधली स्लच काढण्यासाठी १ इंची PVC पाईप ची ग्रीड बनवली .ठराविक अंतरावर ८ MM चे होल मारले व ही ग्रीड १ HP च्या पाण्यातील मोटरला जोडली जेणे करून मोटरच्या सक्शन ने गाळ स्लच टँक जाईल .व मोटरची प्लम्बिंग स्लच टाकी ला दिली .

स्लच टाकी मध्ये पडणाऱ्या पाण्याचे रेकोर्ड ठेवण्यासाठी तेथे फ्लोट सेन्सर लाऊन डेटा मिळवला .स्लच टाकी मध्ये NH३ \NH ४ चे रुपांतर NO३ मध्ये करण्यासाठी यामध्ये बक्टेरिया वाढवण्यासाठी एअर स्प्रेडर देऊन त्या मध्ये MBBR ऐवजी सेडनेट टाकली व स्लच टाकीचा सप्लाय फ्लड & ड्रेन सायफन करून प्लम्बिंग ग्रो बेड ला केली.यामुळे फिश टँक मधून माश्यांचे अमोनिया चे पाणी व स्लच ग्रीड मधून मोटरच्या सहायाने स्लच टँक मध्ये येईल व या पाण्याचे काही प्रमाणात NH३ \NH ४ चे रुपांतर NO३ मध्ये होहून हे पाणी फ्लड & ड्रेन सायफन ने ग्रो बेड मध्ये जाईल व पुढे ग्रो बेड एकमेकांना यु ट्यूब ने कनेक्ट असल्याने त्या दोन रांगा एकाच वेळी ठरावी लेवल पर्यंत भरल्या नंतर शेवटी असलेल्या फ्लड & ड्रेन सायफन ने हे फिल्टर झालेले पाणी पुन्हा फिश टँक मध्ये येईल .अशा प्रकारे तळ्यातील २०% पाणी दरोरोज फिल्टर होईल यामुळे माश्यांना कमी जागेत वाढवू शकतो व जास्त उत्पादन काढू शकतो .

तळ्यातील माश्यांचे खंड्या ,बगळे यांसारख्या पक्ष्यांपासून संवरक्षण करण्यासाठी तळ्यावर कमी खर्चात होणारे बर्ड नेट टाकावयाचे स्ट्रक्चर पाईपच्या कर्व कैची मध्ये बनवले .व यांना दोरी ने सपोर्ट दिला.

या स्ट्रक्चर वर बर्ड नेट पसरवून दोरीने बांधून घेतली .व हिवाळ्यात पाण्याचे तापमान मेन्टेन ठेवण्यासाठी त्यावर काळा प्लास्टिकच्या पेपर ने तळे कव्हर केले .जेणे करून पाण्याचे तापमान २५ ते २६ सेल्सिअस राहिली .

या सिस्टीम मध्ये माश्यांना ऑक्सिजन मिळावा म्हणून अर्धा HP चा एअर ब्लोअर आहे व या मध्ये तीन थ्री वे चे एअर स्प्रेडर तळ्यात व दोन एअर स्प्रेडर स्लच टँक मध्ये आहेत .ब्लोअर व पाण्याच्या पंपाला ठराविक वेळाने चालू करण्यासाठी पॅनल बॉक्स तयार करून यामध्ये टाईमर सेटिंग केली .व येणारे लाईट बिल मोजण्यासाठी मीटर सेट केला आहे .

टाईमर सेटिंग

मासे जस जसे मोठे होतील तसे त्यांचे फीडिंग वेळ बदलते व माश्यांचा आकार वाढीप्रमाणे त्यांच्या फीड चा आकार सुद्धा वाढतो .यामुळे आश्रमात फिश फिडर बनून तो ठराविक वेळाने चालू होण्यासाठी त्याला टाईमर बसवला .फिडरमधील अगर स्क्रू मोटर चालू झाल्यानतर तो फीड पुढे टाकण्याचे काम करतो .व मोटर बंद झाल्यानतर फीड पडणे थांबते .

तळ्यामध्ये कोई मासा लहान मोठे असतील तर ते एकमेकांना खातात म्हणून मोठ्या माश्यांसाठी UPVC १२.५ MM पाईप चे स्ट्रक्चर बनून त्याला शेडनेट लाऊन केज बनवली .व यामध्ये मोठ्या कोई माश्याला ठेऊन त्यांना फीडिंग केले .

मासे दर मिहीन्याला FCR साठी काढले व त्यांच्या वजन व लांबीचे रेकोर्ड ठेवले .त्यांच्या तोंडाच्या आकार प्रमाणे पॅलेट फीड ठरवले .लहान असताना ०.८ MM गोळी व जस जसे मोठे होतील तसे 1MM ,2MM ,3MM ,4MM गोळी त्यांना दिली .

गोळी फीड बरोबर माश्यांच्या १५ % अॅ झोला फीड केला यामुळे गोळी फीड कमी लागले . अॅझोला वाढीसाठी बेड लाऊन त्या मध्ये शेन ,माती व पाणी टाकून त्याला वाढवले यामुळे ५ रुपये kg ने अॅझोला माश्यांना फीड करणे फायदेशीर ठरले .

साधारण आम्ही सरासरी FCR २.१३ ने कोई माश्यांचे उत्पादन ४ महिन्यात घेतले व आम्हाला मार्केट मध्ये २१० रुपये kg रेट मिळाला .यामुळे कोई माश्यांचे ग्रेडिंग करून त्यांना विविध केज मध्ये ठेऊन फीडिंग केले तर कोई करणे सोफे होईल ,या माश्याला मार्केट रेट चांगला असल्याने व हा मासा चार ते पाच महिन्यात चांगले उत्पादन देतो .आम्हाला मिळालेले उत्पादन खालील चार्ट मध्ये आहे .

प्रती महिन्याला मिळालेले माश्यांचे वजन व माश्यांचा FCR :-

पॉलीहाउस मध्ये टोमॅॅटो चे फारसे उत्पादन घेता आले नाही कारण पॉलीहाउस ची उंची कमी असल्याने उन्हाळ्यात तापमान व आद्रता मेन्टेन ठेवणे अडचणीचे झाले यामुळे अळू व पालेभाज्या चे थोडे उत्पादन घेतले .दुसऱ्या बॅॅच मध्ये टोमॅॅटो काढून वाल व दोडका ,दुधी भोपळा ,काकडी यांच्या वेळी लावल्या आहेत .